बँक अकाऊंट नंबर पोर्टेबिलिटी! रिझर्व्ह बँकेकडून बँकांना सूचना; डेप्युटी गव्हर्नर मुंद्रा यांची माहिती

0

नवी दिल्ली- मोबाईल नंबरप्रमाणेच आता बँक अकाऊंट नंबरही ग्राहकांना पोर्टेबिलिटी करता येणार आहे.

या प्रक्रियेवर भर देण्याचे आवाहन ‘आरबीआय’ने बँकांना केले आहे.

बँकांनी अकाऊंट नंबर पोर्टेबिलिटी सेवा सक्षम करण्यासाठी पावले उचलवीत असे आवाहन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) देशातील सर्व बँकांना केले आहे.

बँकिंग क्षेत्रात स्पर्धा निर्माण करण्यासाठी तसेच ग्राहक सेवेत सुधारणा करणे हे बँकिंग क्षेत्रासाठी हा निर्णय म्हणजे मोठे पाऊल ठरणार असल्याचे डेप्युटी गव्हर्नर एस.एस. मुंद्रा यांनी म्हटले आहे.

बँकींग क्षेत्राच्या वार्षिक परिषदेत ते बोलत होते. मुंद्रा म्हणाले, तंत्रज्ञानाशी अधिक जवळीक असणार्‍या नव्या पिढीतल्या ग्राहकांसाठी बँकांनी आता नवे पर्याय उपलब्ध करुन देण्याकडे लक्ष द्यायला हवे. त्याचबरोबर जर सेवेबाबत ग्राहक असमाधानी असेल तर त्याला सहजासहजी एका बँकेतून दुसर्‍या बँकेकडे जाता यायला हवे, असेही मुंद्रा यांनी म्हटले आहे.
यापुढील काळात बँक अकाऊंट्सची पोटेंबिलिटी होण्याची शक्यता असल्याचे सांगतानाच सर्व बँकांनी अकाऊंट नंबर पोर्टेबिलिटीसाठी पुढील काळात काम सुरु करावे अशी विनंती आम्ही बँकांकडे केल्याचेही यावळी मुंद्रा यांनी सांगितले.

त्याचबरोबर बँकांच्या चेक ड्रॉप बॉक्समधून ग्राहकांचे धनादेश गहाळ होण्याबाबतच्या मुद्यावरही त्यांनी यावेळी भाष्य केले. अशा स्वरुपाच्या अनेक तक्रारी सध्या येत आहेत. मात्र, याकडे बँका क्षुल्लक प्रकार असल्याप्रमाणे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर अशा प्रकारच्या घटना घडल्यास ग्राहक धनादेशांच्या विम्याच्या रकमेची वाट न पाहता त्यांना तत्काळ भरपाई देण्यात यावी, असेही ते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

*