शेवगावात बैलपोळा उत्साहात

0
शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – नुकत्याच झालेल्या पावसामुळे तालुक्यात बैल पोळा सर्वत्र उत्साहात साजरा झाला. मात्र अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप चालू असल्याने सजवलेल्या बैलजोड्या ग्रामदेवतांच्या दर्शनासाठी आणताना नागरिकांना छत्र्या, घोंगते याचा आधार घेण्याची वेळ आली. या बैलजोड्या एकाच वेळी आणण्याची परंपरा आता लोप पावत असल्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे.
दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने या सणांवरील दुष्काळाचे सावट बाजूला सारले आहे. रविवारी पोळ्याचा बाजार होता, मात्र पावसामुळे बाजार भरला नाही. यामुळे सोमवारी शेवगाव मधील बाजारपेठ बैल सजावटीच्या सामानासाठी हाऊसफुल्ल झाली होती. घुंगरमाळा, रंगीत गोंडे, फुगे, रंगीत बाशिंगे, सूत, नारळ, चवर यांची मोठी विक्री झाली.
दिवसभर बैलांची रंगरंगोटी
व सजावट करत दुपारनंतर काही गावातून शेतकर्‍यांनी वाजतगाजत बैलजोड्या ग्रामदेवतांच्या दर्शनासाठी आणल्या. घरी आल्यानंतर सौभाग्यवतींच्या हस्ते पूजा करून वर्षभर शेतात राबणार्‍या सोबत्यांना पुरण-पोळींचा नैवेद्य भरून दर्शन घेण्यात आले. यांत्रिकीकरणामुळे बैलजोड्यांची संख्या तशी कमीच झालेली आहे. अनेकांनी मातीची रंगीत बैले विकत घेऊन त्यांची प्रतिकात्मक पूजा केली.
शेवगाव येथेही पावसामुळे बैलजोड्या कमीच आल्या. मात्र आलेल्या सर्व शेतकर्‍यांचा फेटे बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार दीपक पाटील, राष्ट्रवादीचे नेते अरुण लांडे, नगरसेवक अशोक आहुजा, अरुण मुंढे, कमलेश गांधी, दिगंबर काथवटे, नंदकुमार सारडा, रवी सुरवसे, दत्तात्रय फुंदे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*