‘अवतार -२’ लांबणीवर

0

२००९ साली प्रदर्शित झालेला ‘अवतार’ हा चित्रपट सिनेमासृष्टीत आजवर प्रदर्शित झालेल्या सर्वात यशस्वी चित्रपटांपकी एक आहे.

२,७८८ अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त पैसे कमावणाऱ्या या लोकप्रिय चित्रपटाने थ्रीडी अ‍ॅनिमेशनपटांकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोन बदलून टाकला.

आता चाहते ‘अवतार २’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु, दिग्दर्शक जेम्स कॅमरून यांनी सध्या ते एका दुसऱ्या प्रकल्पात गुंतल्यामुळे ‘अवतार’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे वृत्त फेटाळले.

त्यांच्या मते ‘अवतार -२’ हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रकल्प असल्याचे सांगत त्यासाठी तेवढीच चांगल्या पटकथा लेखनाची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले.

२१५४ सालापर्यंत पृथ्वीवरील सर्व खनिजसंपत्तीचा उपभोग मानवाने घेतला असून आता त्याला नवीन ऊर्जासाठय़ाची गरज आहे. संशोधन करून मानव ‘पँडोरा’ नामक ग्रहावर पोहोचतो. तेथील अफाट खनिज संपत्ती पाहून त्या ग्रहावर कब्जा करण्याचा विचार त्याच्या मनात येतो.

त्यासाठी मानवाने सुरू केलेले प्रयत्न आणि त्या ग्रहावरील रहिवाशांनी मानवजातीला केलेला विरोध दरम्यान त्यांच्यात झालेले युद्ध या अभिनव कथेवर आधारलेला ‘अवतार’ प्रेक्षकांना खूप आवडला होता.

 

LEAVE A REPLY

*