नाशिकचे रंगकर्मी व कलादिग्दर्शक अरुण रहाणे यांचे निधन

0

नाशिक, ता.२० : नाशिकचे रंगकर्मी व कलादिग्दर्शक अरुण रहाणे यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते.

त्यांची अनेक नाटक आणि चित्रपट आणि मालिकांमध्ये कला दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. आता पर्यंत त्यांनी २० नाटक व ५० चित्रपटात कला दिग्दर्शक म्हणून विविध सेटस्‌ची उभारणी केली होती. त्यात ३ हिंदी चित्रपटांचाही समावेश आहे.

सावरखेड एक गाव, जत्रा, कवडसा, बकुळा नामदेव घोटाळे, तोचि एक समर्थ, ब्लाईंड गेम, निशाणी डावा अंगठा, सनई चौघडे, राजमाता जिजाऊ हे त्यांचे काही चित्रपट कायम लक्षात राहणारे आहेत.

राजमाता जिजाऊ चित्रपटातील शिवराज्याभिषेक सोहळ्याचा भव्य सेट संपूर्ण कौशल्य पणाला लावून त्यांनी उभारला होता. तसेच श्री स्वामी समर्थ यांच्या चरित्रावर आधारित असलेल्या तोचि एक समर्थ या चित्रपटातील स्वामी मठाचा देखावा त्यांनी मोठ्या कौशल्याने उभारला होता. त्याबद्दल त्यांची वाखाणणीही झाली होती.

कमीत कमी वस्तूंचा वापर करून चित्रपट, नाटक किंवा मालिकेतील प्रसंगात वास्तव निर्माण करणारा कलादिग्दर्शक म्हणून राहाणे यांची ओळख होती.

LEAVE A REPLY

*