Friday, April 26, 2024
Homeजळगावबालसुधारगृहातून पळून गेलेला अल्पवयीन मोटारसायकल चोरटा जेरबंद

बालसुधारगृहातून पळून गेलेला अल्पवयीन मोटारसायकल चोरटा जेरबंद

जळगाव – Jalgaon

पोट दुखत असल्याच्या कारणावरुन मध्यप्रदेशातील बालसुधारगृहातून पळून गेलेल्या अल्पवयीन दुचाकी चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा येथून अटक केली. त्यांच्याकडून चार मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहे.

- Advertisement -

मध्यप्रदेशातील झाबुवा जिल्ह्यातील बाल सुधारगृहातून चोरीच्या गुन्ह्यातील अल्पवयीन चोरटा पोट दुखत असल्याचे कारण सांगून तो पळून गेला होता. या प्रकरणी मध्यप्रदेश पोलिसदलाचे दोन पोलिसांचे निलंबनही झाले होते.

चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला हा संशयीत दुचाकी चोरीत पारंगत असून मध्यप्रेदशातुन पळ काढत त्याने चोपडा तालूक्यात बस्तान मांडले होते. गुन्हेशाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार त्यांनी पोलिस नाईक अश्रफ शेख, इद्रीस पठाण, दत्तात्रय बडगुजर, किरण चौधरी, दिपक शिंदे, भारत पाटिल अशांचे पथक तपासावर रवाना केले होते.

चोरीच्या दुचाकीसह घेतले ताब्यात

पथकाने संशयीताला चोपडा तालूक्यातून चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यावर त्याने एका मागून एक चार वाहने काढून दिली. त्यात धरणगाव, एरंडोल, शिरपुर, धुळे आदी ठिकाणी वाहने चोरुन आणल्याचे त्याने कबुल केले असून काही घरफोडीचे केल्याची त्याने कबुली दिली.

चौकशी अंती त्याला जळगावच्या बालसुधारगृहात दाखल करण्यात आले असून मध्यप्रदेश पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या