पिंपळवाडी चौकात गावठी कट्ट्यासह दोन आरोपी जेरबंद

0

शिर्डी पोलीसांची कारवाई

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – गुप्त खबर्‍यामार्फत मिळालेल्या माहीतीवरून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह दोन आरोपीं शिर्डी पोलीसांच्या पथकाने पिंपळवाडी चौकातून शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास जेरबंद केले.
शनिवारी ( दि. 5 ऑगस्ट) रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर पाटील यांना गुप्त खबर्‍याकडून मिळालेल्या माहीतीनुसार पिंपळवाडी चौकात श्रीरामपूर येथील वार्ड नं. 2 मधील अश्पाक मुश्ताक कुरेशी व मुजम्मील हारून बागवान या दोघांकडे गावठी कट्ट्यांसह दोन जिवंत काडतुसे असल्याची माहीती मिळताच उपअधिक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगदिश मुलगीर, हे.कॉ. इरफान शेख, हे.कॉ. शेलार, हे.कॉ. पंडोरे यांच्या पथकाने सापळा रचून शनिवारी रात्री 11 च्या दरम्यान आरोपींना पिंपळवाडी येथे जेरबंद करून गजाआड केले.

त्यांच्यावर गु र नं. 47/17 अन्वये भादवी कलम आर्म अ‍ॅक्ट 3/25 अन्वये गुन्हा नोंदविला आहेत. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदिप दहीफळे करीत आहे.

LEAVE A REPLY

*