Apple: Iphone 5S च्या किमतीत घट होणार

0

अॅपल आयफोन ५ एस (iPhone 5S) च्या किमतीमध्ये मोठी घट करणार आहे.

अॅपलकडून ‘आयफोन ५ एस’ची किंमत १५ हजार रुपयांपर्यंत खाली आणली जाऊ शकते, असं वृत्त एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिले आहे.

अॅपल भारतात दिवाळीपर्यंत एक्सक्लुझिव्ह ऑनलाईन स्टोर सुरु करणार असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. अॅपलचा भारतीय बाजारातील हिस्सा वाढवण्यासाठी अॅपलकडून आयफोन ५ एसची विक्री ऑनलाईन केली जाण्याची शक्यता आहे. अॅपलनं आयफोनच्या रिटेलर्सना याबद्दलची माहिती दिली आहे.

येत्या काळात आयफोन ५ एसची विक्री फक्त ऑनलाईन करण्यात येणार असल्यानं दुकानांमधील त्यांचा पुरवठा हळूहळू कमी करण्यात येईल, अशी कल्पना आयफोनच्या रिटेलर्सना कंपनीकडून देण्यात आली आहे.

सध्या आयफोन ५ एसची किंमत १८ हजार रुपये आहे.

LEAVE A REPLY

*