जनलोकपालसाठी अण्णांचे फेब्रुवारीत दिल्लीत आंदोलन

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – जनलोकपाल कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी दिल्ली येथे 20 किंवा 25 फेब्रुवारीला आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.
राळेगणसिद्धी येथे मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम पार पडल्यानंतर अण्णांना विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर त्यांनी ही माहिती दिली.
रामलीला मैदान, जंतरमंतर किंवा राजघाटवर हे आंदोलन होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काम चांगलं आहे. नरेंद्र मोदी चुकीचं काम करीत असून फडणवीस यांचं काम योग्य असल्याचं अण्णांनी सांगितलं. शिवाय फडणवीस चुकले, तर त्यांच्याविरोधात देखील आंदोलन करू असे अण्णांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला अच्छे दिनचं स्वप्न दाखवलं. 15 लाखांचं अश्वासन देऊन जनतेची निराशा केल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर जनलोकपाल बिल कमजोर केलं. त्यामुळं फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत आंदोलनाचा इशारा अण्णांनी दिला.
त्यामुळे दिल्लीतल्या आंदोलनाने ऐन थंडीत राजकीय वातावरण तापणार आहे. जनलोकपालच्या अंमलबजावणीसाठी अण्णांनी पंतप्रधान मोदी यांना याअगोदर अनेकदा पत्र लिहिलं आहे. मात्र मोदींकडून पत्राला काहीही प्रतिसाद न आल्याने त्यांनी अखेर आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

*