‘परश्या’ची बॉलिवूडमध्ये एंट्री

0

‘सैराट’ या चित्रपटातून अनेकांच्या मनात स्थान निर्माण करणारा परश्या म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर आता बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यास सज्ज झाला आहे.

आकाश बॉलिवूडमध्ये अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटातून पदार्पण करणार आहे. यात राधिका आपटे आकाशसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

अनुराग कश्यप यांनी आकाशच्या बॉलिवूडमधील पदार्पणाला दुजोरा दिला आहे.

आकाश-राधिका या चित्रपटात एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण असून मुंबईत या चित्रपटातील काही दृश्यांचे शूटिंगही झाल्याची माहिती अनुराग कश्यपने दिली आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाची स्क्रिप्ट राधिकाने लिहिली आहे.

LEAVE A REPLY

*