नाशिकधून एअर डेक्कनचे सप्टेंबर अखेर ‘उडान’

0

नाशिक । दि. 8 प्रतिनिधी – स्वस्तात देशांतर्गत विमान प्रवास उपलब्ध करून देणार्‍या ‘उडान’ या योजनेंतर्गत नाशिकमध्ये सप्टेंबर अखेर नाशिक मुंबई , नाशिक पुणे ही विमानसेवा सुरू करणार असल्याची घोषणा एअर डेक्कनच्यावतीने दिल्ली येथे करण्यात आली.

या विमानप्रवासाचे दर 1500 ते 1800 रूपये असतील असेही कंपनीने स्पष्ट केल्याचे खा. हेमंत गोडसे यांनी सांगितले.
दिल्ली येथे झालेल्या ‘विंग 2017 उडो सब जुडो ’ चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी केेंद्रिय उडडानमंत्री गजपती राजू , जयंत सिन्हा , सिव्हिल एव्हिएशनचे सचिव श्री . चौभे , एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडीयाचे अध्यक्ष खुल्लर तसेच राज्यातील सिव्हिल एव्हिएशनचे अधिकारी, देशातील एअरलाईन्स कंपनीचे जनरल मॅनेजर उपस्थित होते. यावेळी प्रत्येक राज्याने ‘उडान’ योजनेची प्रभावी अंमलजावणी होण्यासाठी काय सवलती दिल्या जातील याचे सादरीकरण केले.

यात महाराष्ट्र सिव्हील एव्हिएशनच्या प्रधान सचिव वत्सला नायर सिंग यांनी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सवलतींबाबत बोलतांना सांगितले , प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत नो एअरपोर्ट चार्जेस , लँडींग , पार्किंग , आणि टिएनएलसी माफ केले आहे. करपात्र मुल्य सेवाकर 10 टक्के च्यावर आकारला जाणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे पोलीस व अग्निशमन सेवा मोफत देण्यात येणार आहे. तसेच वीज, पाणी आणि सवलतीच्या दरात इतर सुविधा देण्यात येणार आहे.

दुसर्‍या सत्रात प्रत्येक राज्यातील सिव्हिल एव्हिएशन अधिकार्‍यांसमवेत सचिव वत्सला नायर , यु.पी.ककाणे , खा. हेमंत गोडसे , व एअर इंडीयाच्या सर्व अधिकार्‍यांशी महाराष्ट्रात व नाशिकमधील विमानसेवा सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. नाशिक हे धार्मिकदृष्टया व औद्योगिक दृष्टया कसे प्रचलित आहे याचाही उल्लेख करत प्रत्येक एअर लाईनशी चर्चा करण्यात आली. तसेच कंपन्यांच्या अडचणीबाबतही यावेळी चर्चा करण्यात आल्याचे गोडसे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*