नेवासा नगरपंचायत निकाल : गडाख गटाला 9 जागा; नगराध्यक्ष मात्र भाजपचा होणार

0

नेवासा (प्रतिनिधी) :  येथील नगरपंचायतच्या बुधवार 24 रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी काल झाली.

17 जागांच्या या नगरपंचायतीत गडाखांच्या क्रांतीकारी शेतकरी पक्षाने 9 जागा जिंकत बहुमत प्राप्त केले असले तरी नगराध्यक्ष पदाच्या अनुसूचित जमाती राखीव मतदारसंघात (प्रभाग 17) भाजपाच्या उमेदवाराने विजय मिळवल्याने येथे नगराध्यक्ष भाजपाचा होणार आहे.

भाजपाने एकूण 6 जागा जिंकल्या आहेत तर काँग्रेसने 1 व अपक्षाने 1 जागा जिंकली. शिवसेना, राष्ट्रवादी व मनसेला एकही जागा जिंकता आली नाही.

नेवासा नगरपंचायतीत कोणाची सत्ता येते याबाबत उत्सुकता होती.

मात्र येथील जनतेने कोणालाही मोठा आनंद मिळू दिला नाही तसेच कोणाला नाराजही न करण्याची किमया साधली.

नेवासा नगरपंचायत निकाल
क्रांतीकारी – 9
भाजप – 6
क्राॅग्रेस – 1
अपक्ष- 1
एकुण – 17

LEAVE A REPLY

*