अहमदनगर : राष्ट्रवादीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार

0
दिवाळपूर्वी कर्जमाफी न दिल्यास भाजप-सेनेला रस्त्यावर फिरूण देणार नाही : दिलीप वळसे
अहमदनगर : तीन वर्षापूर्वी खोटी स्वप्ने, खोटी आश्वासन देवून मोदी सरकार सत्तेत आले. ज्या सोशल मिडियाचा वापर करत करत मोंदींनी सत्ता मिळवली तोच सोशल मिडिया आता त्यांच्या विरोधात गेला आहे. अच्छे दिन, नोटा बंदी, महागाई, पेट्रोल डिझेलचे वाढलेल भाव, शेतकरी आत्महत्या, शेत मालाचे पडलेले भाव, काळा पैसा परत आणण्याचे पोकळ आश्वासन या विरोधात राष्ट्रवादी सर्वसामान्यांच्या भावन घेवून राष्ट्रवादी रस्त्याचवर उतरली आहे.
दिवाळी पूर्वी राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी न दिल्यास भाजप आणि सेनाचला रस्तावर फिरून देण्याचा इशारा विधानसभेचे माजी अध्यक्ष आ. दिलीप वळसे यांनी नगरमध्ये दिला.
राष्ट्रवादीच्यावतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वळसे बोलत होते. यावेळी आ. अरूण जगताप, आ. संग्राम जगताप, निरिक्षक अंकूश काकडे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, महिला अध्यक्षा मंजूषा गुंड, जिल्हा परिषद उपाध्यक्षा राजश्री घुले, नरेंद्र घुले, पांडूरंग अंभग, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, बाबासाहेब भिटे, सुजीत झावरे, सुप्रिया झावरे, सबाजी गायकवाड, प्रताप ढाकणे, राजेंद्र फाळके, अरविंदे शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*