राजकारणाचा ‘अक्षय’ अध्याय

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- आमदार शिवाजीराव कर्डिले पुत्र अक्षय यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा झाला. मात्र, कोणतीही उधळपट्टी न करता अपंगांना सायकलवाटप करून सामाजिक भान जोपासले. या अभीष्टचिंतन सोहळ्यास तब्बल पाच आमदार, तीन माजी आमदार, माजी उपमहापौरांसह महापालिकेतील पदाधिकारी आणि नगर-राहुरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा गोतावळा उपस्थित होता. हभप रामदासमहाराज कैकाडी, हभप जंगलेमहाराज शास्त्री, हभप बाळकृष्णमहाराज भोंदे व हभप आदिनाथमहाराज शास्त्री यांच्या आशीर्वादाने अक्षय यांनी सामाजिक कामाचा वसा घेण्याचे जाहीर करीत राजकीय पटलावरही एन्ट्री केली.

राजकारण अवघड पण, अक्षयसाठी उज्ज्वल
आमदार अरुण जगताप म्हणाले की, अपंग व्यक्तींना मदत देण्याचा चांगला उपक्रम आहे. अक्षय कर्डिले यांनी विधायक कामातून ठसा उमटवावा. गरीबांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करावी. नगर जिल्हा हा राजकारणात सोपा नाही. मात्र, आम्ही समाजात राहून काम करतो. त्यामुळे आम्हाला समाजाने आम्हाला कमी पडू दिले नाही. अक्षय हा नम्र व शांत स्वभावाचा असून, त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे.

युवा नेते अक्षय शिवाजी कर्डिले यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग व्यक्तींना तीनचाकी सायकलचे वितरण हभप रामदासमहाराज कैकाडी, हभप जंगलेमहाराज शास्त्री, हभप बाळकृष्णमहाराज भोंदे व हभप आदिनाथमहाराज शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले.

रामदास महाराज कैकाडी म्हणाले की, समाजातील जे कोणी रंजले गांजले आहेत. त्यांना ओळखा व त्यांना मदत करा. आ. शिवाजी कर्डिले यांनी गेली 25 वर्षे समाजातील वंचितांना मदत करण्याचे काम केले आहे. अक्षय कर्डिले यांनीही त्यांचा सामाजिक वारसा पुढे चालवावा.

तुकाराम महाराजांनी सांगितले की, भगवे व पांढरे कपडे घालून कोणी महाराज वा साधू होत नाही. समाजामध्ये असलेली अंधश्रद्धा दूर करून समाजाला चांगल्या दिशेने घेऊन जाण्याचे काम करणार्‍याचा साधू म्हणतात. अहंकाराचा विनाश झाला पाहिजे. अहंकाराचे गर्वहरण झाल्याशिवाय राहत नाही, हे विसरू नका. पांडुरंगाची भक्ती करा. भक्तीने सर्व सामर्थ्य प्राप्त होते, असे प्रतिपादन हभप रामदासमहाराज कैकाडी यांनी केले.

आ. शिवाजी कर्डिले यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून अक्षय कर्डिले यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले.

वडिलांचा वारसा चालवायचाय…
अक्षय कर्डिले म्हणाले की, माझे वडील आ. शिवाजी कर्डिले यांनी प्रचंड मेहनतीच्या बळावर येथपर्यंत मजल मारली आहे. त्यांचा दैनंदिन कार्यक्रम फारच मेहनतीचा व कष्टदायक आहे. सकाळी 4 पासूनच त्यांचा दिवस सुरू होतो. 6 वाजल्यापासून दूरध्वनी खणखणायला लागतात. प्रश्‍न घेऊन येणार्‍यांची रिघ लागते. एक एक प्रश्‍न हातावेगळे करून ते पुढील कामाला रवाना होतात. हे माझ्या घरातील वातावरण असल्यामुळे मला बर्‍याच गोष्टी शिकायला मिळाल्या. हाच सामाजिक वारसा अखंडितपणे पुढे चालवीन. सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी आपण वाढदिवस साजरा करतो, असे ते म्हणाले.

पाच आजी-तीन माजी आमदारांसह राजकीय गोतावळा
युवा नेते अक्षय शिवाजी कर्डिले यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास वडील आ. शिवाजी कर्डिले, बहीणीचे सासरे आ. अरुण जगताप, नेवाशाचे आ. बाळासाहेब मुरकुटे, मेहुणे आ. संग्राम जगताप, श्रीगोंद्याचे आ. राहुल जगताप, माजी आ. पांडुरंग अभंग, मा.आ. दादा कळमकर, शेवगावचे मा.आ. चंद्रशेखर घुले, चाचा तनपुरे, चंद्रकांत गाडे, साहित्यिकसंजय कळमकर, विक्रम तांबे, मा. जि.प सदस्य सचिन जगताप, राजेंद्र चोपडा, मर्चंट बँकेचे अध्यक्ष संजय गांधी, भाजपाचे नामदेव राऊत, माजी महापौर अभिषेक कळमकर, बाजार समितीचे सभापती विलास शिंदे, रेवण चोभे, संतोष म्हस्के, दिलीप भालसिंग, बन्सी कराळे, बाबासाहेब खर्से, रेश्मा चव्हाण-आठरे, अनिल पोखरणा, अण्णा मुनोत अशी सर्वच क्षेत्रातील मांदियाळी होती.

LEAVE A REPLY

*