उमेश कवडे महापालिकेचे नवे सभागृह नेते

0

अनिल शिंदे आज राजीनामा देणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेचे विद्यमान साभागृह नेते अनिल शिंदे हे आज (दि.10) पदाचा राजीनामा देणार आहेत. नगरसेवक उमेश कवडे यांना साभागृह नेतेपद देण्याचा निर्णय सेनेने घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापौर सुरेखा कदम हे कवडे यांना साागृह नेतेपदी नियुक्तीचे पत्र देणार आहेत.

महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर साभागृह नेतेपदाचा वाद उफाळून आला होता. संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी अनिल शिंदे यांना साभागृह नेते पद दिल्यानंतर कवडे यांनी नाराजी व्यक्त करून पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. कोरेगावकर यांच्या या निर्णयाने कवडे समर्थकांनी कोरेगावकर यांचा निषेध केल्याने सेनेअंतर्गत धुसफुसही झाली होती. सेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी त्यावर पडदा टाकत तेव्हाच शिंदे यांना सव्वा तर त्यांनतरचे सव्वा वर्षे कवडे यांना पद देण्याचा तोडगा काढला होता. शिंदे यांचा कार्यकाळ संपत असल्याने कवडे यांनी पद मिळावे यासाठी पक्षाकडे फिल्डींग लावली.

संपर्कप्रमुख कोरेगावकर, उपनेते अनिल राठोड यांच्या उपस्थित साभागृह नेते अनिल शिंदे, गटनेते संजय शेंडगे, उमेश कवडे, सचिन जाधव यांच्यासह सेना नगरसेवकाची बैठक काल बुधवारी झाली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे शिंदे यांनी राजीनामा द्यावा. कवडे यांना साभागृह नेते पद देण्यावर एकमत झाले. पक्षाच्या बैठकीतील या निर्णयानुसार अनिल शिंदे हे गुरुवारी महापौर सुरेखा कदम यांच्याकडे साभागृह नेतेपदाचा राजीनामा देणार आहेत. उमेश कवडे यांना महापौर कदम हे नवे साभागृह नेते पदाचे पत्र देणार आहेत.

LEAVE A REPLY

*