सार्वमतचे संपादक अनंत पाटील यांना दर्पण पुरस्कार जाहीर

0

अहमदनगर (प्रतिनिधी)– महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा राज्यस्तरीय रौप्यमहोत्सवी दर्पण पुरस्कार दैनिक सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील यांना जाहीर झाला आहे.

संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी ही घोषणा केली.

दर्पण पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम, सन्मानपत्र, जांभेकर चरित्र, ग्रंथ व माहितीपट सी.डी., शाल, श्रीफळ असे आहे. या सर्व पुरस्कारांचे वितरण राज्यस्तरीय पत्रकार दिनी म्हणजे दि. 6 जानेवारी 2018 रोजी करण्यात येणार आहे.

या संस्थेतर्फे गेली 24 वर्षे राज्यातील ज्येष्ठ व गुणवंत पत्रकारांना उल्लेखनीय कार्याबद्दल दर्पण पुरस्कार देण्यात येतात. राज्यातील एका पत्रकार साहित्यिकास बृहन्महाराष्ट्र संपादक संघ पुरस्कृत पत्रमहर्षि वसंतराव काणे पत्रकार साहित्यिक पुरस्कारही दिला जातो. यंदाचे पुरस्काराचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.
अन्य पुरस्कारार्थी असे :

ज्येष्ठ संपादक पुरस्कार – वासुदेव भगवान कुलकर्णी (कार्यकारी संपादक, दैनिक ऐक्य, सातारा), दर्पण पुरस्कार पश्‍चिम महाराष्ट्र विभाग – हरीष पाटणे (सातारा जिल्हा प्रमुख, दैनिक पुढारी, सातारा), कोकण विभाग – उत्तम उर्फ भास्कर सुर्यकांत वाडकर (संपादक साप्ताहिक कडेलोट, प्रतिनिधी दैनिक सामना, सावंतवाडी).
मराठवाडा विभाग – प्रद्युम्न प्रकाशराव गिरीकर (हिंगोली जिल्हा प्रतिनिधी, दैनिक एकमत, हिंगोली), विदर्भ विभाग – प्रशांत मधुकर देशमुख (विशेष प्रतिनिधी, दैनिक लोकसत्ता, वर्धा), बृहन्महाराष्ट्र विभाग – भालचंद्र शिंदे (संपादक, माझी मराठी, कलबुर्गी, जि.गुलबर्गा), पत्रमहर्षि वसंतराव काणे पत्रकार साहित्यिक पुरस्कार – डॉ. जगदीश माधवराव कदम (ज्येष्ठ साहित्यिक, रुई, जि.नांदेड), ज्येष्ठ पत्रकार शंकर पाटील पुरस्कृत साहस पत्रकारिता दर्पण पुरस्कार – संतोष धोंडू पवार (प्रतिनिधी, दैनिक सकाळ, माथेरान, जि.रायगड). विशेष दर्पण पुरस्कार – दत्ता मर्ढेकर (ज्येष्ठ पत्रकार, वाई), भाऊसाहेब कदम (संस्थापक, दैनिक सिंधुदुर्ग समाचार, कोल्हापूर).

LEAVE A REPLY

*