अखेर धनुष केस जिंकला!

धनुष हा आमचा हरवलेला मुलगा आहे, हा एका वृद्ध दांम्पत्याचा दावा धनुषने खोटा ठरवला.

मद्रास हाय कोर्टाने यासंदर्भातील संबंधित दांम्पत्याची याचिका खारिज केली. कातिरेसन आणि त्यांची पत्नी मीनाक्षी या तामिळ दांम्पत्याने धनुष हा त्यांचा मुलगा असल्याचे म्हटले होते.

धनुषच्या उजव्या कॉलरबोनजवळ एक तीळ आहे आणि त्याच्या डाव्या बाजूने एक निशाणी आहे. त्यामुळे धनुषच त्यांचा मुलगा कलईचेवलन असून, जो २००२ मध्ये अभिनेता होण्यासाठी चेन्नईला पळून गेला होता, असा दावा या दांम्पत्याने केला होता.

धनुष हा अभ्यासात कच्चा होता. त्यामुळे २००२ साली तो पळून गेला. यानंतर तो धनुष नावाने चित्रपटात काम करू लागला. त्याचे नाव कलाईसेल्वम आहे. त्याने मेलूरमध्ये आर सी हायर सेकेंडीरी स्कूल व गव्हर्नमेंट बॉईज हायर सेकेंडरी स्कूलमध्ये त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेतले, असाही या दांम्पत्याचा दावा होता.

धनुषच्या वैद्यकीय तपासणीने या दांम्पत्याचा दावा खोटा ठरवला. वैद्यकीय अहवाल आणि अन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने धनुषच्या बाजूने निकाल दिला.
धनुषचे खरे नाव व्यंकटेश प्रभू आहे. तो तामिळ फिल्म प्रोड्यूसर कस्तूरी राजा याचा मुलगा आहे. त्याच्या आईचे नाव विजयलक्ष्मी आहे.

 

Please follow and like us:
0

LEAVE A REPLY

*