नागरी सेवा दिन : पंतप्रधानांच्या हस्ते प्रशासनात उत्तम अधिकाऱ्यांचा गौरव

नवी दिल्लीतील नागरी सेवा दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केले.

या कार्यक्रमात प्रशासनात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

‘सुरुवातीच्या काळात आरोग्य सेवा पुरवण्यासापासून ते अगदी उद्योग उभारणीपर्यंत लोक सरकारवर अवलंबून होते. या सर्वच गोष्टींमध्ये सरकारी विभागांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. मात्र गेल्या १५ वर्षांमध्ये स्थितीत मोठा बदल झाला आहे. आता लोकांकडे पर्याय उपलब्ध आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास लोक खासगी विमान सेवेचा किंवा खासगी आरोग्य सेवांचा वापर करत आहेत,’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

‘गेल्या १५ ते २० वर्षांमध्ये परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. स्पर्धा वाढल्यामुळे सेवेचा दर्जा सुधारला आहे,’ असेही पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.

Please follow and like us:
0

LEAVE A REPLY

*