अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ : अध्यक्ष लांडे तर सचिवपदी शिंदे

0
अप्पासाहेब शिंदे

अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र लांडे तर सचिवपदी अप्पासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष एम. एस. लगड होते.

कार्यकारिणीमध्ये काम करण्यासाठी अनेक जण इच्छुक होते. त्यामुळे उपस्थितांच्यावतीने ज्येष्ठ माजी पदाधिकार्‍यांची निवड समिती निर्माण करुन त्यांनी या निवडी कराव्यात, अशी सर्वानुमते मागणी करण्यात आली. निवड समितीने जिल्ह्याचा विचार करुन सर्वसमावेशक अशी कार्यकारिणीची बिनविरोध निवड केली.

यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून राजेंद्र लांडे व सचिव म्हणून अप्पासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे इतर कार्यकारिणीही निवडण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून मकरंद कोर्‍हाळकर (कोपरगाव), नानासाहेब सुद्रिक (कर्जत), विजय थोरात (श्रीरामपूर), गोरक्षनाथ ठोंबळ (शेवगाव), हरिश्‍चंद्र नलगे (श्रीगोंदा) यांची निवड करण्यात आली.

सहसचिव म्हणून सुभाष पानसंबळ (नगर), अर्जुन भुजबळ (पारनेर), दिलीप ढवळे (जामखेड), जिजाबा हासे (संगमनेर), गीताराम वाघ (पाथर्डी), हे निवडण्यात आले. कोषाध्यक्ष म्हणून जनार्दन पटारे (नेवासा) तर अंतर्गत हिशोब तपासनीस म्हणून राजेंद्र गवांदे (अकोला) व गणेश तांदळे (राहाता) यांची निवड करण्यात आली. निवड समितीत पी. बी. बोलगे, आबासाहेब कोकाटे, शिवाजीराव ढाळे, अशोक नवल, शंकरराव जोर्वेकर, चांगदेव कडू, शिवाजी हरिश्‍चंद्र हे होते.

LEAVE A REPLY

*