11 कोटींच्या जुन्या नोटांची थप्पी! ‘आरबीआय’च्या विरोधात जिल्हा बँकेची सुप्रिममध्ये धाव

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- नोटा बंदीच्या निर्णयानंतर रिर्झव्ह बँकेने जिल्हा बँकेकडील जुन्या हजार, पाचशेच्या 11 कोटी 68 लाखांच्या नोटा स्वीकारल्या नसल्याने या नोटांची थप्पी लागली आहे. रिर्झव्ह बँकेने या नोटा स्वीकाराव्यात यासाठी अहमदनगर जिल्हा बँकही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर पूर्वीच्या 1 हजार, 500 रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानंतर सुरूवातीला जिल्हा बँकेत जुन्या नोटा स्वीकारण्यास परवानगी नव्हती. मात्र, नाबार्डने हस्तक्षेप केल्यानंतर जिल्हा बँकेला नोटा बदलू देण्यास परवानगी मिळाली. जिल्हा बँकेकडे जुन्या नोटापोटी 319 कोटी रुपये जमा झाले होते. रिर्झव्ह बँकेने टप्प्या टप्याने या नोटा बदलून दिल्या. मात्र, जिल्हा बँकेकडे आजही 11 कोटी 68 लाख रुपये मुल्याच्या जुन्या नोटा पडून आहेत. या नोटा स्वीकारण्याबाबत जिल्हा बँकेला वेळोवळी पत्र व्यवहार करण्यात आला, मात्र, रिर्झव्ह बँक या नोटा स्वीकारण्यास तयार नाही. त्यामुळे रिर्झव्ह बँकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष गायकर यांनी दिली.
पिका विमा योजनेत बँकेने यंदाही मोठी कामगिरी केली असून 1 लाख 13 हजार 836 कर्जदार शेतकर्‍यांचा 5 कोटी 42 लाख रुपयांचा हप्ता भरलेला आहे. यासह 1 लाख 606 बिगर कर्जदार शेतकर्‍यांचा 6 कोटी 85 लाख रुपयांचा विमा हप्ता भरला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
………..
जिल्हा बँकेच्या 156 कोटींच्या नोटा रिर्झव्ह बँकेने आठ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर स्वीकारल्या. या काळात बँकेला कोट्यावधी रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड बसला होता. या विरोधात रिर्झव्ह बँकेकडे मागणी करूनही उपयोग होत नसल्याने या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत यावेळी देण्यात आले.

LEAVE A REPLY

*