अहमदनगर शहराचा आज 527 वर्धापन दिन

0

स्थापना दिन : संस्थापक अहमद निजाम शाह कबरीवर चादर चढवण्याचा कार्यक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहराच्या 527 व्या स्थापना दिनानिमित्त अहमदनगर सोशल क्लबच्यावतीने बागरोजा हडको येथील शहराचे संस्थापक अहमद निजाम शाह यांच्या कबरीची स्वच्छता करण्यात आली. आज रविवारी शहराच्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी चादर चढवण्याचा कार्यक्रम होणार आहे. तसेच रसिक गु्रपच्यावतीने चाय पे चर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
अहमदनगर शहराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. त्याकाळी हे शहर जगातील नामांकित शहर म्हणून गणले जात होते. मोठी व्यापारी पेठ म्हणून अहमदनगर शहरात जगभरातील व्यापारी येत होते. शहराचे संस्थापक असलेले अहेमद निजाम शाह यांनी या शहराला जागतिक पातळीवर नेवून पोहचविले होते.
केवळ राजकीय नव्हे तर लष्कारी सामर्थ्य, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार आणि सामाजिक सुधारणा याबाबत अहमदनगर शहराने पूर्वीपासून नावलौकिक मिळवलेला आहे. शहराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात शहराचे बागरोजा हडको येथील शहराचे संस्थापक अहमद निजाम शाह यांच्या कबरवर सकाळी सर्व धर्मियांकडून चादर चढवण्यात येणार आहे. रसिक ग्रुपच्यावतीने चाय पे चर्चा या विशेष कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी 7.00 वाजता ऐेतिहासिक चांदबिबी महाल परिसरात होणार आहे. अहमदनगर शहराच्या भवितव्याच्या दृष्टीने साधक-बाधक चर्चा व्हावी या निमित्ताने विविध क्षेत्रातील व्यक्तींनी एकत्र येऊन विचार मंथन घडावे. अशी या कार्यक्रमामागील कल्पना आहे.

कार्यक्रमास मा.आ.संग्राम जगताप, महापौर सुरेखाताई कदम, डॉ. सुजय विखे, उपमहापौर श्रीपाद छिंदम, उद्योगपती प्रदिप गांधी, नरेंद्र फिरोदिया, सुभाष कायगांवकर, आमीचे अशोक सोनवणे, वृत्तपत्रांचे संपादक व पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. स्थापनादिनी सकाळी निसर्गरम्य वातावरणात सुरु होणार्‍या या कार्यक्रमात नगरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर व परिवाराने केले आहे.
कार्यक्रमास न्यु मॉडर्न कन्स्ट्रक्शनचे संचालक इंजि. इकबालसय्यद यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. रसिक ग्रुपतर्फे यापूर्वी सिद्धी बाग, लोखंडी पुल, फराहबक्ष महाल, हस्तबेहस्त बाग आदी विविध ठिकाणी शहराचा स्थापनादिन साजरा करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*