अण्णा हजारे यांचे सरकारविरोधात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात जनआंदोलन

0

पारनेर (राळेगणसिद्धी) :   ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिध्दी येथे देशभरातील कार्यकर्त्यांच्या राष्ट्रीय बैठकीत लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीबरोबरच शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी सरकारविराधोत जानेवारी 2018 च्या शेवटच्या आठवड्यात जनआंदोलन करण्याचा निर्धार आज रविवारी (दि.8) रोजी करण्यात आला.

राळेगणसिध्दी येथे शनिवार (दि.7) रोजी सरकारविरोधात पुन्हा जनआंदोलन उभारण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील कार्यकर्त्यांची दोन दिवसीय शिबीर सुरू आहे.

कार्यकर्त्यांनी आंदोलनाबाबत रणनीतीवर चर्चा केली. नियोजनाबाबत सूचना केल्या. आज सायंकाळी या दोन दिवसीय शिबिराचा समारोप होणार आहे.

LEAVE A REPLY

*