Thursday, April 25, 2024
Homeनगरपिक कर्जापोटी जिल्हा बँकेने वाटले 2 हजार 302 कोटी

पिक कर्जापोटी जिल्हा बँकेने वाटले 2 हजार 302 कोटी

अहमदनगर (प्रतिनिधी)

खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत 2 हजार 302 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यातील 2 लाख 96 हजार 302 शेतकऱ्यांनी पीककर्जाचा लाभ घेतला आहे. खरीप आणि रब्बी हंगामातील पीक लागवडीसाठी दरवर्षी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना भात, बाजरी, मका, सोराबीन, कापूस, तूर, मूग, भुईमूग, तीळ या खरीप पिकांबरोबरच ऊस आदी पिकांसाठी अर्थ पुरवठा केला जात आहे.

- Advertisement -

नगर जिल्हा बँक आशिया खंडातील सहकारी तत्वारील अग्रणीय बँक म्हणून ओळखली जात असून शेतकर्‍यांना शेती कर्जासोबत शेती विषयक कामासाठी कर्ज देण्याचे काम बँकेच्यावतीने सुरू आहे. यासह जिल्ह्यातील साखर कारखानादारीला जिल्हा बॅकेचा मोठा आधार आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेला 2 हजार 800 कोटी रुपरांचे पीक कर्ज वाटपचे उद्दिष्ट्ये होते. यापैकी आतापर्यंत 2 हजार 302 कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले असल्याचे बँक प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

Agricultural News : खरीप पिकांवरील गोगलगाय किडीचे वेळीच नियंत्रण करा, कृषी विज्ञान केंद्राचा सल्ला

कृषी विभागाने खरीप हंगामासाठी उसाशिवाय यंदा 4 लाख 47 हजार 822 हेक्टर क्षेत्र निश्‍चित केले होते. त्यानूसार जिल्हा बँकेसह जिल्ह्यातील खासगी बँका आणि ग्रामीण बँकांनी शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी कर्ज वाटप केलेले आहे. जिल्ह्यात सध्या दमदार पावसाची प्रतिक्षा असून आतापर्यंत 70 टक्क्यांपर्यंत खरीप हंगामातील पिकांची पेरणी झालेली आहे. लवकर दमदार पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची स्थिती बिकट होण्याची शक्यता असून या अशा परिस्थितीत बँककेडून घेतलेल्या कर्जाच्या फेडीचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेच्या वतीने 2 लाख 7 हजार 15 कोटी 59 लाख रुपरांचे पीककर्ज वाटप केले होते. याचा लाभ 3 लाख 74 हजार शेतकऱ्यांनी घेतला होता. यंदाच्या खरीप हंगामासाठी आतापर्यंत 2 हजार 307 कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. एकंदरीत 84 टक्के कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.

भामट्याने ५०० रुपयांच्या बनावट नोटा देऊन फसवलं; व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

झालेले कर्जवाटप कंसात शेतकरी

अकोले 262. 6 कोटी (33 हजार 719), जामखेड 141. 5 कोटी (18 हजार 163), कर्जत 211 कोटी211 (27 हजार 230), कोपरगाव 61.70 कोटी 211 (7 हजार 733), नगर 264. 60 कोटी (34 हजार 45), नेवासा 59.4 कोटी (7 हजार 674), पारनेर 310.47 कोटी (39 हजार 912), पाथर्डी 194.2 कोटी (25 हजार 37), राहाता 79.17 कोटी (10 हजार 163), राहुरी 74.78 कोटी (9 हजार 659), संगमनेर 278.81 कोटी (35 हजार 882), शेवगाव 121.56 कोटी (15 हजार 615), श्रीगोंदा 194.1 कोटी (25 हजार) आणि श्रीरामपूर 50.9 कोटी (6 हजार 489) यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या