कृषी सल्ला : शेतकऱ्यांनो पेरणीआधी ही बातमी वाचा

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्यातील घाट विभागात मंगळवारी (दि.२७ ) ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला असून बुधवारी (दि. २८) अति जोरदार पाऊस येण्याची दाट शक्यता ग्रामीण कृषी मौसम सेवा ऐ.एम.एफ.यु., इगतपुरी केंद्रातर्फे वर्तविण्यात आली आहे.

जिल्ह्यातील घाट विभागात पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहील पुढील १ ते २ दिवसात जिल्ह्यातील मॉन्सूनचे आगमन लक्षात घेता शेतकरी बांधवानी खरीप पिकांची पेरणी सलग ३ ते ४ दिवस पेरणीयोग्य ७५ ते १०० मी.मी. येवढा पाऊस झाल्यानंतरच करावी,असा सल्ला ग्रामीण कृषी मौसम सेवा ऐ.एम.एफ.यु., इगतपुरीचे प्रमुख अन्वेषक तथा सहयोगी संशोधन संचालक डॉ. हेमंत पाटील व संशोधन सहयोगी गजेंद्र फुलपगारे यांनी दिला आहे.

Mumbai Rain : मुंबईत पावसाचा धुमाकूळ; तीन दिवसात ६ जणांचा मृत्यू

खरीप पिकांच्या पेरणीसाठी घरचे बियाणे वापरावयाचे असल्यास बियाणाची उगवण क्षमता तपासावी. जिवाणु संवसर्धक पाकीट सावलीत, थांड जागेत ठेवावे. बियाण्यास बुरशीनाशक अथवा कीटनाशक लावावयाचे असल्यास ती अगोदर लावावीत व त्यानांतर जिवाणु संवर्धक बियाण्यास लावावे.

K Chandrashekar Rao : पंढरपुरात येण्याआधी चंद्रशेखर राव यांचा मटणावर ताव, मिटकरींचा आरोप

दुसऱ्या पंधरवाड्यात चांगला पाऊस झाल्यावर वापश्यावर बीजप्रकिया करून मुग व ऊडदाची पेरणी करावी. (प्रति किलो बियाणास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा व यानांतर २५ ग्रॅम रायझोबियम जिवाणु संवर्धक) कांदा, वांगी, टमाटे, मीरची, फ्लॉवर व कोबी पीकाच्या रोपवाटीकेसाठी रोपे गादी वाफ्यावर तयार करावेत, असा कृषी सल्लाही त्यांनी दिला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *