शेती मशागतीला वेग; पश्चिम पट्ट्यात भात लागवडीची तयारी

0
ठाणापाडा | सुरगाणा तालुक्यातील ठाणापाडा हा अतिदुर्गम भाग आहे. तसेत ह्या तालुक्यातील अनेकजण शेतीची कामे आटोपून झाल्यावर मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात.

तालुक्यातील 50 टक्के नागरिकांकडे जमीनच नाही. मग ते डोंगरउतारावरची जमीन कसतात आणि पावसाळ्यात खरीपाचे एक उत्पन्न घेतात.

सापुतारा ठाणापाडा हतगड बाेरगाव पावसाने बळीराजाला दिलासा दिल्याने ह्या भागात खरडणी नागरणी पेरणी जाेरात चालु आहे.

सुरगाणा ग्रामीण भाग असल्यामुळे मुख्ये पिके म्हणजे नागली वरई भात हे पिके माेठ्या प्रमाणात घेतली जातात.

सापुतारा परिसरात दररोज पावसाच्या सरी कोसळतात. नियमित रिमझिम सुरु असते. या परिसरावर निसर्गगाने जणू काही हिरवा शालू परिधान केला आहे असे सध्या येथे वातावरण आहे.

पावसापासून जशी मोकळीक मिळेल तशी बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त असून येणाऱ्या काळात उत्तम उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात येथील बळीराजा दिसून येतो.

LEAVE A REPLY

*