कृषी विभाग जलयुक्तच्या 241 गावातील 1 हजार 205 व्यक्तींना देणार प्रशिक्षण

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- जलयुक्त अभियानाअतंर्गत यंदाच्या वर्षात 241 गावांत जलयुक्तची नविन कामे करण्यात येणार आहे.दरम्यान संबधित गावातील प्रत्येकी 5 व्यक्तिंना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाने दिली.
16 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरपर्यत एकूण एक हजार 205 व्यक्तींना प्रशिक्षण देण्यासाठी पाच संस्थांची नियुक्ती करण्यात आली.सदर संस्थाना जलयुक्त कामाबाबत परीपूर्ण माहिती 17 ते 29 जुलै दरम्यान यशदा पुणे येथील प्रशिक्षणात देण्यात आले आहे.पाणी आडविणे,पाण्याचा वापर,पिकाला लागणारे पाणी, पाण्याचा ताळेबंद आदीबाबात प्रशिक्षणात माहिती देण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षण संस्थेच्या कार्यक्षेत्रात होणार आहे. यामध्ये हिंदस्वराज्य ट्रस्ट अंतर्गत राष्ट्रिय पाणलोट विकास प्रक्षिण केंद्र (राळेगणसिध्दी), यशवंत कृषी ग्राम व पाणलोट विकास संस्था (हिवरेबाजार), वॉटरशेड वॉगनायझेशन स्ट्रट व गोविंद ग्रामीण विकास प्रतिष्ठान (नगर), कृषी सेवा संघ, विसापूर आदी परच संस्था 241 गावातील बाराशे लोकांना प्रशिक्षण देणार आहे.
तालुकानिहाय गावे व (प्रशिक्षणार्थीची संख्या) – 
नगर-20 (100), पारनेर (140), श्रीगोंदा- 11 (55), पाथर्डी-10 (85), शेवगाव-13 (65), राहुरी-6 (30), अकोले-38 (190), कोपरगाव-9 (45), राहाता-4 (20), संगमनेर-38(190), श्रीरामपूर- 1 (5), नेवासा-10 (50), कर्जत-38 (190) व जामखेड-12 (60) आदी 141 गावातील 1 हजार 205 व्यक्तिंना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*