सरकार शेतकरी कर्जाच्या पापाचे धनी – राजू शेट्टींनी डागली तोफ

0

नाशिक : मी शेतकऱ्यांची भाषा बोलणार मला कुणाला घाबरायची गरज नाही. कर्जमाफी मागण्याची वेळ का आली यांच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. राज्य सरकारकडे कर्ज मागण्याची वेळ का आली यांच्या मुळाशी जण्याची गरज आहे.

सरकार शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेते आहे. कृषी मूल्य ठरवणार आयोग हे सरकारच खेळणं आहे. शेतकरीकर्जाच्या पापाचे धनी सरकार आहे. असे म्हणत आज नाशिकमध्ये राजू शेट्टी यांनी सरकारवर तोफ डागली. ते नाशिकमधील शिवसेनेच्या कृषी अधिवेशनात बोलत होते.

राजू शेट्टी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :

महायुतीत मी शेतकऱ्यानं साठी आलो.
स्वामींनाथन आयोग लागू करण्याच्या आश्वासनामुळे मी महायुतीत.
मुख्यमंत्री अभ्यास करायला कोणत्या देशात जायचंय
तुम्ही विरोधी पक्षात असताना 7/12 कोरा करायची भाषा करत होते आता भाषा का बदलली.

तुम्ही बिघडणार नाही याची खात्री दिली होती का?

2019 लांब नाही जनताही जागा दाखवून देईल.,
हा शेतकरी तुम्हाला मातीत घालेल.
एक निवडणूक जिंकली म्हणजे झालं असं नाही.
निवडणुका जिंकण्याआधी दिलेले आश्वासन विसरले का?

कर्ज माफ केले तर आत्महत्या थांबतील याची खात्री मागता तुम्ही.
तुम्ही बिघडणार नाही याची खात्री दिली होती का?

शेतकरी गाडण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला गाडू.

सातवा वेतन आयोग लागू करता मग कर्ज मुक्ती देताना विचार का करावा लागतो?
तुम्ही वाल्याचे वाल्मिकी करता इतके वाल्मिकी नको राज्याला. हे राज्य इतके बिघडले नाही.
समृद्धी करता तुम्ही त्यापेक्षा आधी शेतकरी समृद्ध करा.
कर्ज मुक्ती हा शाश्वत उपाय नाही पण आता शेतकरी उभा करायचे असेल तर कर्ज मुक्त हे सलाईन आहे.  स्वामींनाथांन आयोग लागू करा परत दारात येणार नाय.
अरुंधती भट्टाचार्यला माहेरून पैसे आणायचे का?
45000 शेतकऱ्यांच्या विधवांचे कर्ज मिटवा. दानत दाखवा नाहीतर तुम्हालाही महागात पडेल.

LEAVE A REPLY

*