अभिनेत्री आलिया भट ही बनली इन्व्हेस्टर!

0

अभिनय सृष्टीतील प्रत्येक कलाकार आज कोणत्या ना कोणत्या बाबींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवत असताना दिसत आहे.

मग यामध्ये यंग जनरेशन तरी का मागे राहतील ? स्टुडंट ऑफ दि ईयर पासून ते डियर झिंदगी पर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री आलिया भटसुद्धा सध्या गुंतवणुकीमध्ये लक्ष देत आहे.

दिनमान शाह आणि अर्चना वालावलकर यांच्या स्टाईलक्रॅकर ह्या स्टार्टअप कंपनी मध्ये तिने इन्व्हेस्ट केले आहे.

आपल्या भविष्याचा विचार करत असता अनेक कलाकार योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक करत असतात. खूप वर्षांपासून तिची केशभूषाकार अर्चना वालावलकरची हि कंपनी असल्यामुळे तिने अगदी आनंदात गुंतवणूक केली असून आलियाने ह्या कंपनीमध्ये किती शेयर इन्व्हेस्ट केलेले आहेत याची माहिती मात्र गुलदस्त्यात ठेवलेली आहे.

स्टाईल क्रॅकरमध्ये व्होग कंपनीचा सुद्धा 65 टक्के वाटा आहे.

LEAVE A REPLY

*