दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा!

0

गेल्या चार दिवसांपासून किडनीच्या त्रासामुळे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल असलेले ज्येष्ठ अभिनेते  दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

लीलावती रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

रुग्णालयाचे उपाध्यक्ष अजयकुमार पांडे यांनी आयएएनएसशी बोलताना म्हटले की, ‘त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना आता ताप नाही. श्वास घेण्यासही काही त्रास होत नाही. ते पूर्णपणे शुद्धीवर आहेत. त्यांनी डॉक्टरांनी सांगितल्यानुसार जेवणही केले आहे. त्यांच्या रक्तातील क्रिटीनिन स्तर कमी असून, त्यांना व्यवस्थितरीत्या लघुशंका होत आहे. जे आमच्यासाठी चांगले संकेत आहेत

अभिनेते दिलीप कुमार यांना युरिन इन्फेक्शन आणि डिहायड्रेशनमुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

 

 

 

LEAVE A REPLY

*