मुलीच्या विवाहाच्या दिवशी एक झाड लावण्याच्या उपक्रम

0
तेलकुडगाव (वार्ताहर) – लग्न होऊन सासरी जाणारी गावातील मुलगी कायमस्वरूपी डोळ्यासमोर राहावी म्हणून तिच्या हस्ते घरासमोर एक झाड लावण्याचा संकल्प केलेेले तेलकुडगाव येथील पोलीस पाटील शिवाजीराव घोडेचोर यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी 23 मे या उपक्रमास प्रारंभ केला.
लावण्यात आलेली ही झाडे निम्मी जगली तरी वृक्षारोपणास मोठा हातभार लागेल असे त्यांचे म्हणणे आहे. या वृक्षांमुळे गावाची शोभा वाढणार आहे. या वृक्ष लागवडीप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठलराव काळे सामाजिक कार्यकर्ते पोपटराव सरोदे, तुळशीराम काळे, सुनील राजहंस, चंद्रकांत गटकळ, हरिभाऊ गटकळ, रुपचंद गटकळ, संभाजी घोडेचोर, वसंत घाडगे, महेश घोडेचोर, शिवाजी घोडेचोर, गोरख घोडेचोर, राजेंद्र काळे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
विवाहप्रसंगी शिवाजी घोडेचोर यांनी आपली मुलगी आश्‍विनी हिचे एमएससी पर्यंतचे शिक्षण ज्या ज्या शाळेत झाले त्या शाळांना रोख रक्कम भेट देऊन आगळावेगळा उपक्रम राबवल्याने कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

*