सलमानच्या घरात ‘मनोरुग्ण’ शिरतो तेव्हा…

0

सलमान खान याच्या वांद्रे येथील निवासस्थानी शनिवारी रात्री एका तरुण शिरल्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

सुरक्षारक्षकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले; मात्र त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून त्याला सोडून दिले.

संबंधित मनोरुग्ण युवक (२५) वांद्रे रेक्लमेशन परिसरात राहतो. शनिवारी रात्री तो फिरत फिरत सलमान खानचे निवासस्थान असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये घुसला.

प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नसल्याने त्याला सहज प्रवेश मिळाला. मात्र, तेथील प्रसाधनगृहात शिरताना सुरक्षारक्षकाने त्याला हटकले.

संबंधित तरुणाने गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्याला चोप देत, वांद्रे पोलिसांच्या ताब्यात दिले. या वेळी सलमान घरी नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*