Photo Gallery : अॅसिड हल्ल्यातील पीडितेला मिळाला जोडीदार; विवेक ओबेरॉयने गिफ्ट केला फ्लॅट!

0

शुल्लक कारणावरून चुलत भावाकडून झालेल्या अॅसिड हल्ल्याची शिकार झालेल्या ललिता बेनबंसी (26) हिला मंगळवारी आयुष्याचा जोडीदार मिळाला. राहुल कुमार (27) हा तरुणासोबत ललिताने अग्निच्या साक्षीने सात फेरे घेतले.

ललिता आणि राहुलने ठाणे कोर्टात नोंदणी पद्धतीने विवाह केला. नंतर मुंबईत रिसेप्शन पार पडले. या सोहळ्याला अॅसिड हल्ल्याची शिकार झालेल्या अनेक तरुणी- महिला सहभागी झाल्या होत्या.

ललिता मूळ उत्तर प्रदेशातील आझमगड येथील आहे. उल्लेखनिय म्हणजे ललिता आणि राहुलला बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेराय याने फ्लॅट गिफ्ट केला आहे.

ललिता आणि राहुलला अभिनेता विवेक ओबेरॉय याने फ्लॅट गिफ्ट केला आहे. सोबतच तो भविष्यात ललिताच्या चेहर्‍यावर करण्यात येणार्‍या ऑपरेशनचा खर्च करणार आहे.

 

LEAVE A REPLY

*