औरंगाबाद नाक्यावर पोलीस वाहनाला अपघात

0
पंचवटी । पंचवटीतील औरंगाबाद नाका येथे आज दुपारच्या सुमारास ग्रामीण पोलिसांच्या वाहनाचे ब्रेकफेल झाल्याने किरकोळ अपघात झाला. वाहनाचे ब्रेकफेल झाल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.
या अपघातात पोलीस वाहनासह खासगी चारचाकी वाहनाचे नुकसान झाले. तर दुचाकीवरील युवती किरकोळ जखमी झाल्याची घटना झाली.

आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास पंचवटीकडून आडगांवकडे ग्रामीण पोलिसांची टाटा सुमो एम.एच.15एए-5183 ही गाडी जात असताना औरंगाबाद नाका येथील चौकात गाडीचे बे्रकफेल झाल्याचे चालक पोपट पवार यांच्या लक्षात आले. दरम्यान गाडीवरील नियंत्रण मिळवत असताना येथूनच जाणारी गाडी क्र.एम.एच.17व्ही-5509 या वाहनास पोलिसांच्या गाडीचे धडक बसली.

तर दुसरीकडे स्कूटी क्र.एम.एच.15डीपी-5074 या गाडीवरून इंजिनिअरिंग कॉलेजची विद्यार्थिनी रस्ता ओलांडत असतांना तीच्या गाडीला देखील धक्का लागला. यानंतर पोलिसांची सुमो गाडी महामार्गावरील दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात स्कूटी गाडीवरील युवती विद्या मधुकर गावंडे(वय.21 रा.अमृतधाम) ही किरकोळ जखमी झाली.

तर पोलीस वाहनासह एम.एच.17व्ही-5509 या खासगी गाडीचे नुकसान झाले. औरंगाबाद नाका परिसरांत मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ तसेच बस व खासगी प्रवासी वाहन थांबा असल्याने कायमच प्रवाश्यांची वर्दळ असते. अपघात घडला त्यावेळी देखील याठिकाणी प्रवाश्यांची गर्दी होती.

मात्र पोलीस वाहनांवरील चालक पोपट पवार यांनी वेळीच प्रसंगावधान राखत गाडीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*