लखमापूर फाटानजीक भीषण अपघात; तीन ठार, दोन गंभीर जखमी

0
वणी : अहमदाबाद गुजरात येथून अहमदनगरकडे जाणाऱ्या बलेनों कार झाडावर आदळल्याने अपघात होउन दोन जण जखमी तर तीन जण जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील वाकुडी फाटा येथील नविन बबन कांडेकर (२२) मंगल बबन कांडेकर (४२) आशा साहेबराव गावडे (४५) छगन मांणकू कांडेकर (२५) व चालक मानिष भाऊसाहेब गवळी (२३) हे नविनच पासिंग न केलेली मारुती बलोने कारने अहमदाबाद गुजरात येथून रात्री ९ वाजेच्या सुमारास अहमदनगर येथे येण्यासाठी निघाले होते.

दरम्यान, वणीपासून जवळ असलेल्या लखमापुर फाटा येथे रस्त्याच्या कडेला झाडाला आदळल्याने त्यातील चालक मनिष गवळी व नविन कांडेकर हे दोघे जखमी झाले तर मंगल कांडेकर, आशा गावडे व छगन कांडेकर हे जागीच ठार झाले अधिक तपास पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

*