त्र्यंबकरोडवर अपघात; १ ठार ४ जखमी

0
नाशिक | त्र्यंबकरोडवर हॉटेल संस्कृतीजळव आज सकाळी नउच्या सुमारास अल्टो गाडीला झालेल्या अपघातात 1 जण ठार तर 4 जण जखमी झाले. जखमीपैकी एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत काम करणारे पाच शिक्षक अल्टो गाडीतून मोखाडयाकडे जात होते.

यावेळी वेगावर नियंत्रण मिळवितांना झालेल्या अपघातात गाडीतील के सी जाधव हे माध्यमिक शिक्षक ठार झाले. तर अन्य चार शिक्षक जखमी झाले.

त्यातील बडगे यांची प्रकृती अत्यवस्थ असून इतर तीन शिक्षक साधारण आहे. जखमींवर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

*