अभिनव शाळेत गणरायाला पर्यावरणपुरक निरोप

0

नाशिक । दि. 31 प्रतिनिधी
गंगापूररोडवरील अभिनव बाल विकास मंदिर येथे शाडू मातीच्या गणरायाची स्थापना करण्यात आली होती. या गणरायाचे शाळेतच हौदातच विसर्जन करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.

यावेळी संस्थेचे शिक्षणाधिकारी चंद्रजित शिंदे , जिल्हा परिषद विस्तार अधिकारी विजय पगार , उर्जा प्रतिष्ठानचे संस्थापक अजय बोरस्ते , दिपक हांडगे , प्रविण मराठे , शरद देवरे , संजय घोडके , आदित्य बोरस्ते आदि उपस्थित होते.

यावेळी गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका मिनाक्षी गायधनी यांच्या मार्गदर्शनाने शाळेतील विद्यार्थ्यांकडून कागदी व कापडी पिशव्या बनवून घेण्यात आल्या, त्याचेही प्रदर्शन यावेळी आयोजीत करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

*