आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे डाऊनलोड करता येणार आधार आणि पॅनकार्ड; वाचा सविस्तर

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई | Mumbai

सध्याच्या काळात व्हॉट्सअ‍ॅप हे एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप बनले असून त्याचे जगभरात अनेक यूजर्स आहेत. त्यातच नागरिकांनी आता भारतीय रेल्वेमध्ये (Railway) खाण्यापासून ते ऑनलाईन तिकीट बुक (Book tickets online) करण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यास सुरुवात केली आहे…

त्यातच आता व्हॉट्सअपचा अधिकाधिक वापर पाहता भारत सरकारने (Government of India) देखील व्हॉट्सअ‍ॅपवर नागरिकांना काही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सरकारी कागदपत्र डाऊनलोड करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करता येणार असून नागरिकांना आधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card) व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) वरून डाऊनलोड करता येणार आहे.

भारत सरकारच्या ई-गव्हर्नन्स पोर्टल (MyGov Helpdesk) वरून नागरिकांना या सेवांचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये डिजीलॉकरच्या मदतीने पॅन आणि आधारकार्ड देखील सहज डाऊनलोड करता येणार आहे. नागरिकांना डिजीलॉकरच्या (DigiLocker) विविध सेवा देण्यासाठी व्हॉट्सअॅपवर चॅटबॉटही सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, यासाठी नागरिकांना (Citizens) अँड्रॉइड किंवा iOS डिव्हाईसवर डिजिलॉकर अॅप डाउनलोड करून लॉग इन करावे लागेल. त्यानंतर मोबाईल नंबर वापरून आधार आणि पॅन सेवा डिजीलॉकरशी लिंक करावी लागेल. तसेच व्हॉट्सअ‍ॅपद्वारे आधार कार्ड आणि पॅन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी नागरिकांना काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार असून त्यासाठी संबंधित क्रमांकावर मेसेज करून डीजीलॉकर सर्व्हिस सुरु करावी लागेल. त्यानंतर संबंधित माहिती भरून आधार आणि पॅन कार्डची पीडीएफ मिळेल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *