माजी मंत्री व आमदार ए.टी. पवार यांचे मुंबईत निधन

0

नाशिक, ता. १० : कळवणचे माजी आमदार आणि राज्याचे माजी राज्यमंत्री अर्जुन तुकाराम (ए.टी.) पवार यांचे मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्याने आज सकाळी निधन झाले आहे. ते 79 वर्षाचे होते.

त्यांच्यावर उद्या सकाळी ११ वाजता दळवट, ता. कळवण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गेल्या 8 दिवसापासून त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

ते आठ वेळा विधान सभेवर निवडून गेले होते. पशुसंवर्धन दुग्धविकास, आदिवासी विभागाचे ते माजी राज्यमंत्री होते. कळवणसह नाशिकच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले होते.

विकासपुरुष व पाणीदार नेता म्हणून मतदारसंघात ओळख होती. स्वतंत्र आदिवासी विकास मंत्रालयाची स्थापना करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

गेली चार दशके कळवणच्या सार्वजनिक कार्यात चतुरस्त्र व्यक्तीमत्व म्हणून दादासाहेब अर्थातच ए.टी. पवार यांचा नावलौकिक होता.

साधी राहणी, निगर्वी विचारसरणी व दळवट ते मुंबई असा राजकीय प्रवास करतांना अनेक राजकीय पदे सांभाळत प्रामाणिकपणे त्याला न्याय देणारे व्यक्तीमत्व असा त्यांचा उल्लेख करावा लागेल.

आदिवासी खात्याचे मंत्री असताना त्यांनी अनेक लोकोपयोगी योजना मार्गी लावल्या होत्या.

मुळचे दळवट, ता. कळवण येथील असलेले ए.टी. पवार. यांनी मराठवाडा विद्यापीठातून एम.एचे पदव्युत्तर शिक्षण घेतले होते.

राष्ट्रवादी पक्षातर्फे त्यांनी २००९ची आमदारकीची निवडणूक लढविली होती.

Blog : एटी पवार : पदाचा अभिमान नसलेला कृष्णनगरमधील साधा रहिवासी

LEAVE A REPLY

*