पंचवटी एक्सप्रेस एक जुलै पर्यंत बंदच

jalgaon-digital
2 Min Read

नाशिकरोड | Nashik

प्रवाशांचा प्रतिसाद करोना संकटामुळे घटल्याने रेल्वेचा तोटा वाढू लागला आहे. हे लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दिल्लीला रोज धावणा-या मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळत असल्याने ही गाडी आठवड्यातून दोनदाच सोडण्यात येणार आहे.

मनमाडहून मुंबईला रोज धावणारी व नोकरदार-व्यावसायिकांची आवडती पंचवटीही ०१ जुलैपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मध्ये रेल्वेने ही माहिती दिली आहे.

मुंबई- हजरत निजामुद्दीन राजधानी विशेष रेल्वे गाडी २९ जूनपर्यंत मंगळवार व शनिवारी आणि निजामुद्दीन- मुंबई राजधानी विशेष गाडी ३० जूनपर्यंत बुधवार आणि रविवारी चालविण्यात येणार आहे.

नवीन सूचनेनुसार ही गाडी दररोज धावणार नाही. पंचवटी बंद असल्याने राज्यराणी, नंदीग्राम, तपोवन याच गाड्यांवर नाशिककरांची भिस्त आहे.

करोनाच्या लाटेमुळे नागरिकांनी व्यवसाय, पर्यटन, शिक्षण आदी कारणांसाठी घराबाहेर पडणे बंद केले आहे. आपल्या कर्मचा-यांना करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून अनेक शासकीय व खासगी कार्यालयातही वर्क फ्रॉम होम धोरण अवलंबिण्यात आले आहे. काही शासकीय कार्यालयांमध्ये 15 टक्केच कर्मचारी बोलाविण्यात येत आहेत. मुंबईहून दिल्लीला रोज धावणा-या राजधानी एक्सप्रेसमधून सध्या पाच टक्केही प्रवासी प्रवास करत नाही.

मुंबईला नोकरी, व्यवसाय, शिक्षण, पर्यटनासाठी जाणा-या नाशिककरांसाठी पंचवटी एक्सप्रेस अत्यंत लाडकी आहे. या गाडीलाही करोना संकटामुळे 25 टक्के प्रतिसाद लाभत आहे. अनेक जण खासगी वाहनांनी मुंबईला जात आहे. काहीजण कसारामार्गे लोकलने मुंबई गाठत आहे. त्यामुळे पंचवटीचाही तोटा वाढत आहे. मात्र, ज्यांना खासगी वाहन अथवा कसारामार्गे लोकलने जाता येत नाहीत, त्यांचे हाल होत आहेत. शिर्डी, नागपूर, अमरावती, जालनाच्या गाड्या सध्या रद्द करण्यात आल्या आहेत.

25 जून ते 1 जुलैपर्यंत रद्द करण्यात आलेल्या गाड्या- दादर- साईनगर शिर्डी, पुणे-नागपूर, मुंबई-नागपूर, मुंबई-अमरावती, मुंबई-जालना, दादर- साईनगर शिर्डी, पुणे-अमरावती, पुणे-अजनी, कोल्हापूर- नागपूर, नागपूर- कोल्हापूर, नागपुर-अहमदाबाद.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *