Saturday, April 27, 2024
Homeनाशिकमनमाड : करमाफीबाबत प्रशासनाचे मौन

मनमाड : करमाफीबाबत प्रशासनाचे मौन

मनमाड ।प्रतिनिधी

लॉकडाऊन काळातील मालमत्ता व पाणीपट्टी कर तसेच थकीत करावरील व्याज माफ करण्याचे दोन्ही ठराव नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत एक मताने मंजूर करण्यात आले. या निर्णयाचा मोठा गाजावाजा देखील केला गेला. मात्र पंधरा दिवसाचा कालावधी उलटल्यानंतर देखील अद्यापही या बाबत स्पष्ट खुलासा प्रशासनातर्फे होत नसल्याने नागरीका मध्ये कर भरण्या संदर्भात संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

मालमत्ता व पाणीपट्टी कर आणि व्याज माफ केले जाणार आहे कि नाही याबाबत पालिका प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.दरम्यान दोन्ही ठराव एकमताने मंजूर करणारे नगरसेवक याबाबत काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लॉकडाऊन काळात सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. लोकांच्या हाताला कामधंदा नव्हता त्यामुळे शासकीय नोकरदार वर्ग सोडले तर इतरांना रोजच्या गरजा देखील भागवणे कठीण झाले होते लॉकडाऊन आता शिथील असले तरी व्यापार व्यवसायात मंदीचे सावट आहे तसेच अनेकांच्या हाताला आजही कामधंदा नाही त्यामुळे कोरोनामुळे निर्माण झालेली आर्थिक कोंडी आज ही कायम आहे अशा वेळी राज्यातील इतर मनपा व नगर पालिकेप्रमाणे मनमाड नगर परिषद प्रशानाने दिलासा देण्याची अपेक्षा शहरवासियांतर्फे व्यक्त केली जात असतांना पाणीपट्टी, घरपट्टी व्यतिरिक्त देखील अनेक कर लावून थकीत करावर मोठ्या प्रमाणात व्याज आकारून त्याची वसुली पालिका प्रशानाने सुरु केल्याने नागरिकामध्ये तीव्र असंतोष पसरला होता.

पालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यावर येवून ठेपलेली असल्यामुळे नगरसेवक त्याच्या तयारीला लागलेले असताना पालिका प्रशानाने नागरिकांना पाठवलेली बिले पाहून नगरसेवक देखील संतप्त झाले व त्यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या बाबत आक्रमक भूमिका घेवून वेल मधून उतरून ठिय्या आंदोलन करत कोरोना व लॉकडाऊन काळातील घर पट्टी, पाणीपट्टी माफ करण्यात यावी शिवाय थकीत करावरील व्याज माफ करण्यात यावे अशी जोरदार मागणी करून तसा एकमताने ठराव देखील मंजूर केला होता

त्यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते.मात्र पंधरा दिवसाचा कालावधी उलटल्यानंतर ही याबाबत नागरिकांना कोणताही दिलासा अद्यापही मिळालेला नाही त्यामुळे घरपट्टी, पाणीपट्टी व कारवरील व्याजात सूट मिळणार कि नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या