Friday, April 26, 2024
Homeनगरकांदा चाळीसाठी १ कोटी ४५ लाखांचे अनुदान प्राप्त

कांदा चाळीसाठी १ कोटी ४५ लाखांचे अनुदान प्राप्त

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत जिल्ह्य़ातील १६८ शेतकऱ्यांना सन २०१९-२० या वर्षातील कांदा चाळीच्या  प्रलंबित अनुदानाची सुमारे १कोटी ४५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले असल्याची माहीती खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली.

- Advertisement -

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना  कढणीतोर व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत अनुदान देण्याची योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे.या योजने अंतर्गत नगर जिल्ह्य़ातील  शेतकऱ्यांनी अनुदानासाठी प्रस्ताव दाखल केले होते.परंतू विविध कारणांमुळे मिळू न शकलेले अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे यासाठी प्रशासकीय स्तरावर आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून जिल्ह्यातील १६८ शेतकऱ्यांना त्यांचे प्रलंबित अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे खा.डॉ विखे पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्य़ातील आठ तालुक्यातील १६८ शेतकऱ्यांना या योजनेतून १ कोटी ४५ लाख ७६ हजार रुपयांचे अनुदान मिळणार असून यामध्ये जामखेड ५ शेतकऱ्यांना ४ लाख ३७ हजार,कर्जत शेतकरी ३७ अनुदान ३२ लाख ३७ हजार राहुरी शेतकरी २० अनुदान १७ लाख ४८हजार,शेवगाव ३८ ३२ लाख ९५ हजार,श्रीगोंदा ४६ शेतकरी ३९ लाख ५५ हजार अकोले तालुक्यातील १२ शेतकऱ्यांना  ११लाख १५ हजार, नेवासा शेतकरी ४ अनुदान ३ लाख ५० हजार, संगमनेर शेतकरी ५ अनुदान ४ लाख ३७ हजार रुपयांचे अनुदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या