Friday, April 26, 2024
Homeनगरराष्ट्रीय महामार्गाची नागरिकांकडून दुरूस्ती

राष्ट्रीय महामार्गाची नागरिकांकडून दुरूस्ती

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

कल्याण -निर्मल (विशाखापट्टणम) राष्ट्रीय महामार्गाच्या अपूर्ण कामाचा फटका नागरिकांना बसत आहे. शहरातील पोळा मारुती मंदिराजवळ गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या पुलाचे काम अर्धवट आहे. संबंधित ठेकेदाराने पुलाशेजारी पर्यायी रस्ता सुरू केला आहे. मात्र रस्ता दलदलीचा आणि चिखलाचा झाल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. यावर उपाय म्हणून परिसरातील नागरिक व ऊस वाहतूकदारांनी स्वखर्चातून पुलाजवळील पर्यायी रस्त्याची दुरुस्ती करून रस्ता जड वाहतुकीसाठी योग्य बनविला .

- Advertisement -

तालुक्याच्या पूर्व भागातील मुख्य रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात या रस्त्याने दुचाकीसह चार चाकी व इतरे अवजड वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. मोठी वाहतूक या रस्त्याने होत असल्याने रस्ता अरुंद बनवून खचला होता. त्यामुळे धोकादायक वाहतूक या ठिकाणाहून सुरू असल्याचे लक्षात येताच ऊस वाहतूकदार आणि याठिकाणी असणार्‍या परिसरातील नागरिकांनी स्वखर्चातून जेसीबी व ट्रॅक्टरच्या साह्याने खडी व मुरूम टाकून रस्ता सुरळीत केला. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख विष्णू ढाकणे, उदय गर्जे, माजी नगरसेवक महेश बोरुडे, राहूल बोरुडे, प्रसाद बोरुडे,पप्पू गर्जे, विजय पालवे, दिलीप शिंदे, बाळू केरकळ, उदय गर्जे, विजय बोरुडे आदी उपस्थित होते.

गेल्या बुधवारी याच राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या कामासाठी व रस्त्यावरील खड्डे बुजवावेत या मागणीसाठी सर्वपक्षीय दशक्रिया विधी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी संबंधित शासकिय विभागाने रखडलेले काम लवकर सुरू करू व खड्डे भरून रस्ता सुरळीत केला जाईल, असे आश्वासन दिले होते तसे न होता या रस्त्याची अवस्था जैसे थे च आहे.

कबरींची विटंबना

राष्ट्रीय महामार्ग विभागाने पर्यायी वाहतुकीसाठी शहराजवळील पोळा मारुती मंदिरा जवळील मुस्लिम कब्रस्तानची भिंत बेकायदेशीर पाडून वाहतूक वळवली आहे. यामुळे नदीचे घाण पाणी कब्रस्तानमध्ये शिरल्याने कबरीची विटंबना होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने भिंत बांधून द्यावी व कब्रस्तानची विटंबना थांबवून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखवू नयेत, असे निवेदन सकल मुस्लिम समाजाच्यावतीने तहसीलदार, पोलीस निरीक्षक पाथर्डी यांना देण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या