एमबीबीएसमध्ये नाशिकच्या सुलतानला ९, तर मानसीला ७ सुवर्णपदके

0

नाशिक, दि,15, प्रतिनिधी 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 17 व्या दीक्षांत समारंभात सुवर्णपदकांवर नाशिकचेच वर्चस्व दिसून आले. यात डॉ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाचा एमबीबीएसचा विद्यार्थी सुलतान मोईउददीन शौकतअली या विद्यार्थ्यांने विविध विषयात 9 तर याच महाविद्यालयाची मानसी मयुर गुजराथी या विद्यार्थीनीला 7 सुवर्णपदक प्रदान करण्यात आली.

विद्यापीठाच्या शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनी येथे झालेल्या या समारंभासाठी कुलपती गिरीश महाजन अध्यक्षस्थानी होते.

तर प्रमुख अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे संचालक प्रा डॉ रंदीप गुलेरिया व सन्माननीय अतिथी म्हणून टाटा मेमोरिअल हॉस्पीटलचे संचालक डॉ राजे्ंरद बडवे, कुलगुरू डॉ दिलीप म्हैसेकर, प्रतिकुलगुरू डॉ मोहन खामगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते. सु

वर्ण पदकांची घोषणा सुरू झाल्यानंतर डॉ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी सुलतान मोईउददीन शौकतअली यास डॉ. दयानंद , स्वर्गीय व्यंकटेश जामकर, राजेबहाददूर हार्ट फाउंडेशन,डॉ एस एम पाटणकर, स्वर्गीय श्रीराम खशाबा बाकरे, डॉ अजन्येतू , गोजरबाई रामराव भामरे, डॉ शिरीष के भन्साळी, डॉ विनायक चितळे हे सर्व सुवर्णपदक तर जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन मुंबई यांच्याकडून 10 हजार रूपये रोख अशी एकूण 9 पारितोषिक देण्यात आले.

 

तर याच महाविद्यालयाची एमबीबीएसची विद्यार्थीनी मानसी मयुर गुजराती हिस क्रांतीज्योती डॉ रखमाबाई मेमोरिअल, शामराव अलीयस,नानासाहेब चौधरी, डॉ कामलताई देशमुख, स्वीर्गीय विजयादेवी फडतारे, डॉ. सुधाकर साने, डॉ ग.ज.परांजपे अशी एकूण 7 सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.

या दोन्ही विद्यार्थ्यांची नावे पुकारली जात असतांना विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी सभागृहात एकच जल्लोष केला.

यावेळी या विद्यार्थ्यांची दखल घेवून त्यांच्या यशाचे गमक जाणून घेणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. दरम्यान या विद्यार्थ्यांना पाठबळ देण्यासाठी मविप्र संस्थेच्या सरचिटणीस निलीमा पवार या देखील सोहळयाप्रसंगी उपस्थित होत्या.

‘साखर कारखान्यां’कडून 10 कोटी युनिट वीजेची निर्मिती

0

39 कोटी रुपये किंमतीच्या वीजेचे महावितरणला वितरण;
चार कोटी युनिटचा स्वत:साठी वापर

अहमदनगर (प्रतिनिधी)- साखर कारखान्यांत साखरेच्या उत्पादनासोबत आता विविध उपपदार्थ निर्मिती सुरू आहे. साखर कारखान्यांतील सहविज प्रकल्पातून नाशिक विभागातील नगर आणि नाशिक जिल्ह्यातील खासगी आणि सहकारी अशा 12 साखर कारखान्यांनी 10 कोटी 20 लाख युनिट वीज निर्मिती केली आहे. निर्मिती करण्यात आलेल्या वीजेतून या कारखान्यांनी स्वत:ची गरज भागवून महावितरण कंपनीला 39 कोटी रुपये किंमतीच्या वीजेची विक्री केली आहे.

महिनाभरापूर्वी नगरसह, नाशिक जिल्ह्यात साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले. साखरेच्या उत्पादनासोबत कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर लक्ष केंद्रीत केलेे आहे. शेतकर्‍यांच्या ऊसाला जास्तीजास्त भाव मिळावासाठी नगरसह राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार आंदोलने झाली. यातून 2 हजार 500 रुपयांपर्यंत कारखानदारांना भाव घोषित करावा लागला. साखरेचे बाजारात पडणारे भाव आणि शेतकर्‍यांना देण्यात येणारा दर यातील दरी कमी करण्यासाठी हे उपपदार्थ किफायतशीर ठरणार आहेत.यामुळे उपपदार्थ निर्मितीला महत्व आले आहे.

नगर जिल्ह्यातील अशोक, थोरात, ज्ञानेश्‍वर, कुकडी, मुळा, संजीवनी, डॉ. विखे पाटील आणि नाशिक जिल्ह्यातील डॉ. वसंतदादा या सहकारी साखर कारखान्यांनी सहविज निर्मिती प्रकल्पातून वीजेचे उत्पादन केले आहे. तर नगरमधील गंगामाई, जयश्रीराम, अंबालिका, अल्ट्रा शुगर, व्दारकाधिश या खासगी कारखान्यांतून वीज निर्मिती सुरू झाली आहे. हे कारखाने तयार होणार्‍या विजेतून स्वत:ची गरज भागवून महावितरण कंपनीला विज वितरीत करत आहेत.

नगर आणि नाशिक जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांतून 18 कोटी 13 लाख रुपयांची, तर खासगी कारखान्यांतून 20 कोटी 94 लाख रुपयांची वीज महावितरणला देण्यात आलेली आहे. महावितरण कंपनी प्रत्येक कारखान्याला वेगवेगळ दर आकारात आहे. 6 रुपये ते 6 रुपये 36 पैसे प्रति युनिटनूसार कारखान्यांच्या वीजेला महावितरणकडून पैसे देण्यात येत आहे.

चालू हंगामात जिल्ह्यातील 21 साखर कारखान्यांनी बुधवारअखेर 32 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले असून त्यातून 29 लाख 58 हजार क्विंटल साखर निर्मिती झालेली आहे. जिल्ह्याचा साखर उतारा 9.24 टक्के निघाला आहे.मळीपासून दारू, इथेनॉल, अल्कोल या उपपदार्थाचे उत्पादन घेण्यात येते. जिल्ह्यात साखर कारखान्यांकडे सध्या 79 हजार 815 मेट्रीक टन मळी शिल्लक आहे.

नगरसह राज्यातील साखर कारखान्यांनी कोट्यावधी ओतून कारखान्यांत सहवीज निर्मिती प्रकल्प सुरू केलेले आहेत. मात्र, सौर ऊर्जेतून 2 रुपये 98 पैसे प्रती युनिट वीज निर्मित होते आहे. भविष्यात सौर ऊजेचा वापर वाढल्यास साखर कारखान्यांच्या सहविज निर्मिती प्रकल्पाही धोक्याची घंटा ठरणार आहे. महावितरण देखील मागणी आणि उपलब्ध वीजेनूसार कारखान्यांकडून वीज घेत आहे. यामुळे कारखान्यांतील सहवीज प्रकल्पाचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. 

गुडबाय 2017 (कोपरगाव) : संघर्षाच्या अनेक हाल‘चाली’

0
भारताचे राष्ट्रपती महामहीम रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काकडी येथून विमानसेवेला प्रारंभ झाला तो सुवर्णक्षण

गोदावरी जीर्ण कालव्यांचा प्रश्‍न 2017 मध्येही अनुत्तरीत

कोपरगाव तालुक्यातील काकडी विमानतळाचे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते लोकार्पण झाले. 2017 मधील या ऐतिहासिक सोहळ्याचे कोपरगावकर साक्षीदार ठरले. साईबाबांचे नाव असलेल्या विमानतळामुळे कोपरगावचे नाव जगाच्या नकाशावर झळकले. कोपरगावच्या दृष्टीने हा सुवर्णक्षण ठरला. मात्र जीर्ण झालेल्या गोदावरी व निळवंडे कालव्यांचा प्रश्‍न 2017 मध्येही अनुत्तरितच राहिला. त्यामुळे दारणा-गंगापूर धरण समूहातील सर्व धरणे काठोकाठ भरलेली असतानाही शेती व पिण्याच्या पाण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील जनतेला संघर्ष करावा लागला. 

नानासाहेब शेळके
कोपरगाव तालुक्यातील जनतेसाठी 2017 हे वर्ष कही खुशी कही गम असे ठरले. दोन वर्षांपासून पडणार्‍या धो धो पावसामुळे तालुक्यातील बळीराजा सुखावला मात्र शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका बळीराजाला बसला. विक्रमी उत्पादन झाल्याने शेतमाल मातीमोल भावाने विकावा लागला. अनेकांचे खर्च केलेले पैसेदेखील वसूल झाले नाहीत. त्यातूनच नैराश्य आलेल्या बळीराजाने शेतकरी संपाचे हत्यार उपसले. पूर्वीचा कोपरगाव व सध्या रहाता तालुक्यात असलेल्या पुणतांबा गावातून शेतकरी संपाची बीजे पेरली गेली. शेतकरी संपाचे लोण राज्यभर पसरले. शेतकर्‍यांनी भाजीपाला व दूध पुरवठा बंद केल्याने देशाची आर्थिक राजधानी मुंबई काही काळ स्तब्ध झाली. शेवटी मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकर्‍यांनी हे आंदोलन थांबविले. देशभरात हे आंदोलन गाजले. भाजप सरकारचा ड्रीम पोजक्ट मुंबई नागपूर समृध्दी महामार्गाला कोपरगाव तालुक्यातील 11 गावांमधील शेतकर्‍यांनी विरोध केला. हा माहामार्ग होऊ नये यासाठी अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. मात्र शेतकर्‍यांचा विरोध मोडून काढण्यात सरकार यशस्वी ठरले. मोठ्या प्रमाणात जमिनीचा मोबदला दिल्याने शेतकर्‍यांनी जमीन खरेदी देण्यास संहमती दर्शविली. वर्षाच्या प्रारंभीच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यातील जनतेने सत्ताधारी भाजप सरकारला नाकारत राष्ट्रवादीच्या हातात सत्तेच्या चाव्या दिल्या. युवा नेते आशुतोष काळे यांचे नेतृत्व याच काळात अधिक विस्तारले. विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. जिल्हा परिषदेचा एकही गट त्यांना मिळविता आला नाही. केवळ पंचायत समिती गणाची एक जागा त्यांच्या पक्षाला जिंकता आली. समृध्दी महामार्गाच्या आंदोलनताही विरोधकांकडून आ. स्नेहलता कोल्हे यांची कोडी करण्याचा चोहोकडून प्रयत्न झाला. मात्र त्यांनी हे आंदोलन यशस्वी हाताळत जनक्षोभ वेळीच शांत केला. या दोन्ही घटनांची धुळवड थांबते न थांबते तोच ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू झाली. यावेळी मात्र आ. कोल्हे यांनी तालुक्यातील 26 पैकी 16 ग्रामपंचायती जिंकून विरोधकांना व्हाईट वॉश दिला. विशेष म्हणजे माजी आ. अशोकराव काळे यांच्या माहेगाव देशमुख गावात सरपंचपदी भाजपचा उमेदवार विराजमान केला. कोपरगाव नगरपालिकेत वर्षभर श्रेयवादावरून लढाई पाहावयास मिळाली. आ. कोल्हे यांचे नेतृत्व झुगारत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सावता सुभा मांडला. मात्र पालिकेत बहुमत भाजपाचे आसल्याने त्यांचा प्रवास खडतर झाला. काम एकच मात्र ते आम्हीच मंजुर केले असा दावा दोघांकडून अनेकवेळा झाल्याचे कोपरगावकरांनी पाहिले. पालिकेत नगराध्यक्ष, मुख्याधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. या वादाच्या राजकारणात कोपरगावकरांचे मात्र अतोनात नुकसान झाले. सर्व धरणे भरलेली असूनही शहरवासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागला. नाशिक जिल्ह्यात झालेलल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे मंजूर बंधारा वाहून गेला. यात नदीकाठच्या शेतकर्‍यांच्या जमिनी वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. शिवाय बंधार्‍यात पाणी न आडल्यामुळे शेकडो एकरढ बागायत शेती पाण्याअभावी पडीक ठेवावी लागली. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.

ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे नातू आणि आमदार स्नेहलता कोल्हे व संजीवनीचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचे राजकीय वारसदार विवेक कोल्हे यांचा वर्षाअखेरीस झालेला विवाह सोहळा राजकीय दृष्ट्या चर्चेचा ठरला. त्यांच्या विवाह सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह राजकारणातील अनेकांनी हजेरी लावली याची चर्चा झाली, आता पुढील राजकारणात विवेक यांची भूमिका काय याबाबत तालुक्यात उत्सुकता आहे.

गावाचे सरपंच पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडले.
राष्ट्रपतींच्या हस्ते काकडी विमानतळाचे उदघाटन झाले, मात्र काकडीकरांचे प्रश्न 2017 मध्येही प्रलंबितच राहिले.
ऱाज्य शासनाचा ड्रीम प्रोजेक्ट समृद्धी महामार्ग रद्द होण्यासाठी आंदोलन. संवत्सर ते तळेगाव ग्राम सडक योजना पूर्ण.
नागपूर मुम्बई समृद्धी महामार्गासाठी धोत्रे गावातून पहिली जमीन खरेदी.आरटीजीएस द्वारे शेतकर्‍याच्या खात्यावर ऑनलाईन पेमेंट वर्ग
चांदेकसारे गटात राष्टवादीच्या सोनाली रोहमारे यांचा मोठ्या फरकाने विजय.
समृध्दी महामहार्गाला विरोध करण्यासाठी शेतकर्‍यांनी अनेक आंदोलने केली.
ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक सरपंच भाजपचे.
संजीवनीच्या ऋषिकेश देवकरला ट्रायडेंटमध्ये वार्षिक नऊ लाख रुपयांचे पॅकेज.
आऊटलुक मॅगेझिनचा सर्वे ः संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय देशात 53 व्या क्रमांकावर
संजीवनी अ‍ॅकॅडमीच्या अनुराधा भिंगारेचा महाराष्ट्र सॉफ्ट बॉल संघात समावेश, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.
पोहेगाव पाट पुलाचा प्रश्न आ. स्नेहलता कोल्हे यांनी मार्गी लावून पूल वाहतुकीसाठी खुला केला.
आरटीएसइ परीक्षेत आत्मा मालिकचे दोन विद्यार्थी राज्यात प्रथम

कृषी
उच्च न्यायालयाच्या पाटपाणी निर्णयाला काळे कारखान्याचे सुप्रीम कोर्टात आव्हान
तालुक्यातील चासनळी येथील संदीप चांदगुडे व हांडेवाडीचे विजय आहेर यांनी पिकविलेल्या द्राक्ष व डाळिंबाला उच्चांकी भाव.
चासनळी, मंजूर, धामोरी, मोर्वीस गावाला वरदान ठरलेला मंजूर बंधारा अतिवृष्टीमुळे फुटला. शेतकर्‍यांचे मोठे नुकसान.
निळवंडे धरणाला 2017 मध्ये निधी मिळेल अशी अपेक्षा लाभधारक शेतकर्‍यांना होती. मात्र अश्‍वासनांखेरीज काहीच पदरी पडले नाही.
राजंणगाव देशमुख पाणीपुरवठा योजनेच्या धोंडेवाडी साठवण तलावाशेजारील संपादित क्षेत्रातील 27 विहिरी व तीन बोअरवेल महसूलने बुजविले.
चासनळी येथील प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत चांदगुडे यांना जिल्हा परिषदेमार्फत दिला जाणारा महाराष्ट्र शासनाचा प्रयोगशील शेतकरी पुरस्कार.
37 महिला बचतगटांना शेतीशी निगडी व्यवसाय सुरू करता यावे यासाठी आ. स्नेहलता कोल्हे यांनी जिल्हा सहकारी बँकेच्या सहकार्यांने 20 लाख 66 हजार रुपयांचे कर्ज वितरण केले.
बचत गटाच्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्रियर्दर्शिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी गोदाकाठ मोहत्सवाचे आयोजन करून महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

क्राईम
धारणगाव येथील साईश्‍वर प्रमोद बारहाते या चिमुकल्याचा बोरवेलमध्ये अडकून दुदैवी मृत्यू.
पोहेगावात एटीएम फोडून चोरट्यांनी चार लाख रोकड लुटली.
सोनेवाडीच्या शेतकर्‍यांना व्यपार्‍यांने कापूस खरेदीत दोन कोटींना लुटले.
कोळपेवाडी येथील डॉ. कोळपे खून प्रकरणाचा तपास चार वर्षे उलटूनही कायम तपासावरच.
संवत्सर शिवारात प्रेयसीवर बलात्कार करून तरूणाची आत्महत्या.
मुंबई नागपूर महामार्गावर टँकरने दिलेल्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू.
शेती वाटून देत नाही म्हणून मुलांनीच केला बापाचा खून. रांजणगाव देशमुख येथील रणधीर कुटुंबातील घटना.
सुरेगाव येथे बळीराम थोरात यांचा दगडाने ठेचून खून.
आचलगाव शिवारात विहिरीत सापडलेल्या तीन मृतदेहांची ओळख चार वर्षे उलटूनही पटली नाही.
पत्नीच्या तक्रारीवरून पतीस बेकायदेशीररीत्या पोलीस ठाण्यात डांबून ठेवल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक शिंदे यांना औरंगाबाद खंडपीठाचा 50 हजारांचा दंड. पत्नीसह नातेवाईकांनाही धरले दोषी.

राजकारण…
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आ. स्नेहलता कोल्हे यांचा पराभव
कोल्हेंचा बालेकिल्ला असलेला शिंगणापूर गटातून काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश परजणे विजयी. माजी सभापती मच्छिंद्र केकाण यांचा पराभव.
कोपरगाव पंचायत समितीवर कॉग्रेसला बरोबर घेत राष्ट्रवादीची सत्ता.
ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवचा वचपा काढण्यात आ. स्नेहलता कोल्हे यशस्वी.
माजी. आ. अशोकराव काळे यांच्या माहेगाव देशमुख येथे भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे जनतेतून सरपंच.
काळे गटाचा बालेकिल्ला असलेल्या माहेगाव, बक्तरपूर, मोर्वीस ग्रामपंचायतीत सत्तातर. कोल्हे गटाची सत्ता.
नितीन औताडे यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीचा अस्त. शिवसेनेत प्रवेश
पोहेगाव परिसारातील 2017 मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये कोल्हे गटाने बाजी मारली.
ग्रामपंचायत निवडणुकीत काळे, कोल्हे गटाचे उमेदवार नाकारत चासनळी व वेस येथे सरपंचपदी अपक्ष उमेदवार.

सहकार
बाजार समित्यांचे संचालक मडळ निवडण्याचा अधिकार थेट शेतकर्‍यांना दिला. बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकर्‍यांना मतदान करण्याचा अधिकार.
नोटबंदीमुळे जिल्हा सहकारी बँका आडचणीत सापडल्या. त्याचा परिणाम शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करण्यावर झाला. रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकांचे पैसे बदलून न दिल्याने आठ महिने जिल्हा बँकेला कर्जपुरवठा करता आला नाही. कर्ज न मिळाल्याने बळीराजाला वेळेवर पेरणी करण्यासाठी सोने नाणेे गहाण ठेवून तसेच सावकारच्या दारात चकरा मारून पैसे उपलब्ध करावे लागले.
नोटबंदीचा परिणाम सहकारी साखर कारखान्यांवरही झाला. जिल्हा बँकेकडून कारखान्यांना वेळेवर पतपुरवठा न झाल्याने शेतकर्‍यांनी उसाची लागवड केली नाही. परिणामी 2016-17 मध्ये कारखान्यांचा हंगाम अल्पकाळ चालला. केवळ दोन महिने धुराडी पेटल्याने कारखान्यांचेही मोठे नुकसान झाले. कारखान्यांवर आवलंबून असणारे व्यावसायिक, कामगार यांना इतरत्र रोजगार शोधण्याची वेळ आली.
याच काळात सहकारी कारखान्यांच्या तोट्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

शिक्षण
संजीवनीमध्ये इस्रोचे प्रदर्शन ग्रामीण भागातील अंतराळ प्रेमींसाठी प्रथमच संधी
बहादरपूर येथील सागर जोंधळे लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण.
राज्यस्तरीय टेबलटेनिस स्पर्धेत सोमैयाच्या तेजस्विनी सांगळे, श्‍वेता शिंदे, प्रीती विंचू, रुतजा लांडगे, अर्पिता लांडगे यांची निवड.
पुणे विद्यापीठाने घेतलेल्या अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षांमध्ये संजीवनीच्या हर्षदा चाफेकरला 3 सुवर्ण पदकांसह एकूण 13 बक्षिसे
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयास नॅक कडून ए ग्रेड
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय कार डिझाईन सादरीकरणात देशात तिसरे. नॅशनल एटीव्ही चॅम्पियनशीप स्पर्धेसाठीचे पहिल्या फेरीचे यश
गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना एलआयसी तर्फे स्टुडंट ऑफ द इयर 2017 पुरस्कार
जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचे दोन संघ राज्य पातळीवर
महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत आत्मा मालिक गुरुकुलाचे 72 विद्यार्थ्याची गुणवत्ता यादीत निवड
आत्मा मालिकच्या बॉलबॅडमिंटन संघाची राज्यस्तरावर निवड
ओम गुरूदेव गुरुकुलास जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार

सामाजिक
युवा नेते आशुतोष काळे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम एक्सलन्स राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
सौ. मनाली कोल्हे एज्युप्रनर पुरस्कारने सन्मानित
संत परमानंद महाराज यांची महाराष्ट्र योगा असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड
डाऊच बुद्रुक ग्रामपंचायतीला उकृष्ट जलसंवर्धन पुरस्कार.
पोहेगाव ग्रामपंचायतीने 3 कोटी 80 लाख लिटर क्षमतेचा साठवण तलाव बांधला.
गौतम सहकारी बँकेस जिल्हा सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने पुरस्कार प्रदान
आशुतोष काळे यांची रयत शिक्षण संस्थेवर निवड
तालुक्यातील 10 लाखांचा पहिला
स्मार्ट ग्राम पुरस्कार डाऊच बुद्रुक ग्रामपंचायतीला.
संजीवनी फार्मसी महाविद्यालयास नॅक कडून ए ग्रेड, दर्जा व गुणवत्तेमध्ये अग्रेसर असल्याची सिध्दता
आशुतोष काळे यांची दि डिस्टीलर्स असोसिएशन च्या उपाध्यक्षपदी निवड
कोपरगाव तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी पोलीस पाटील इंद्रभान ढोमसे यांची निवड

आरोग्य
जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते यांच्या प्रयत्नातून चासनळी आरोग्य केंद्रास दोन कोटी10 लाखांचा निधी
शहराचे आरोग्य धोक्यात आणणार्‍या प्लॅस्टिक बंदीसाठी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यापार्‍यांची बैठक घेऊन शहरात प्लॅस्टिक बंदी केली.
शहरातील नागरिकांना आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी पालिकेने ग्रीनी द ग्रेट या पुणे येथील संस्थेला दिलेला ठेक्यातच अनियमितता केल्याचा नगराध्यक्ष व मुख्याधिकार्‍यांवर आरोप.

खेळ
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा बेसबॉल संघ राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम
राष्ट्रीय नेहरू हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलकडे महाराष्ट्राचे नेतृत्व
संजीवनी अ‍ॅकॅडमीचा बेसबॉल संघ जिल्ह्यात प्रथम
संजीवनी अ‍ॅकॅडमी पॅसेपॅलो स्पर्धेत राज्यात प्रथम. क्रीडा क्षेत्रात यशस्वी घौडदौड
आत्मा मालिकच्या विद्यार्थ्याची राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड
नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सायली टेके व तनया अमोलिक यांची निवड.

 

पियुषकडून ऊस दराबाबत नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांची फसवणूक

0

शेतकरी महासंघाचे आज कारखान्यांचे गेट बंद आंदोलन

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील पियुष (वाळकी) साखर कारखान्यांने शेतकर्‍यांना एफआरपीनूसार 2 हजार 550 रुपये प्रमाणे भाव देण्याची घोषण करून प्रत्यक्षात 2 हजार 100 रुपयांनी भाव देत शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. या विरोधात नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांसह शेतकरी महासंघाच्यावतीने सोमवार (दि.18) कारखान्यांचे गेटबंद करण्यात येणार आहे.
पियुष कारखान्यांच्यावतीने नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांचा ऊस गाळपासाठी नेलेला आहे. हा ऊस नेतांना तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना ज्ञानेश्‍वर आणि मुळा कारखान्यांपेक्षा अधिक भाव देवू असे खोटे आश्‍वासन देण्यात आले. मात्र, ऊस गाळपासाठी तोडून नेल्यावर आता प्रत्यक्षात शेतकर्‍यांना 2 हजार 100 रुपये प्रमाणे पैसे देण्यात आले आहेत. हा प्रकार म्हणजे शेतकर्‍यांची फसवणूक आहे.
ऊस दर निश्‍चित करण्यासाठी 15 दिवसांपूर्वी नगरला जिल्हा प्रशासन, सहसंचालक साखर आणि कारखाना व्यवस्थापनाची एकत्रित बैठक झाली होती. त्यावेळी कारखान्यांनी शेतकर्‍यांच्या ऊसाला 2 हजार 250 रुपयेनूसार देण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या.
मात्र, आर्थिक कारण पुढे करत कारखान्यांची 2 हजार 300 ते 2 हजार 500 पर्यंत भाव देण्याचे मान्य केले होते. त्यावेळी हा निर्णय पियुष कारखान्यांच्या वतीने मान्य करण्यात आला होता. आता पियुषकडून त्यावर अंमलबजावणी होत नसल्याने शेतकरी महासंघाकडून नेवासा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या हिता आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे प्रमुख संभाजी दहातोंडे यांनी सांगितले.

महिला बालकल्याणच्या भरतीमध्ये महिलांना 30 टक्के आरक्षण

0

विधवा, परित्यक्त्य, घटस्फोटीतांचे नॉन क्रिमिलेअरचे निकष ठरवले

अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला बालकल्याण विभागातील शासकीय, निमशासकीय व शासन अनुदानीत संस्थांच्या सेवांमध्ये भरतीत महिलांसाठी 30 जागा आरक्षित ठेवण्याचे आदेश शुक्रवार (दि. 15) महिला बालकल्याण विभागाच्या वतीने काढण्यात आले आहेत. या सुधाररित आदेशात भरतीमधील विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटीत महिलांचे नॉन क्रिमिलेअरचे निकष ठरवण्यात आले आहेत.

राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागात महिलांना 30 टक्के आरक्षण यापूर्वीच देण्यात आलेले आहेत. महिला बालकल्याण विभागाच्या 2001 शासन निर्णयात स्पष्टता नसल्याने भरतीमध्ये महिला उमेदवारांच्या नॉन क्रिमीलेअरच्या प्रमाणपत्रांच्या पडताळणीत अडचणी येत होत्या. यामुळे महिला बालकल्याण विभागाच्या भरतीमध्ये 30 टक्के आरक्षणांच्या अंमलबजावणीसाठी आयुक्तालय स्तरावर एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने सुचवल्यानूसार शिफारशी नूसार आता महिला बालकल्याण विभागाला महिलांच्या 30 टक्के आरक्षणासाठी सामान्य प्रशासन व सामाजिक न्याय व विशेष साहय्यता विभाग यांचे आदेश लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खुल्या प्रवर्गातील महिलांच्या भरतीबाबत नॉन क्रिमिलीअरच्या प्रमाणपत्राबाबत स्पष्ट निदेर्श देण्यात आले आहेत. यात विधवा महिलेच्या पतीच्या निधनामुळे प्राप्त झालेले उत्पन्न, परित्यक्त्या महिलेचे उत्पन्न निश्‍चित करतांना अधी संबंधीत महिलेच्या घरीगृह भेट देवून खात्री करावी, तिच्या वडीलांचे उत्पन्न अथवा स्वत: नोकरी करत असल्यास स्वत:चे उत्पन्न ग्राह्य धरावे, घटस्फोटीत महिलेला तिच्या भूतपूर्व पतिकडून मिळणारी पोटगी हे नॉन क्रिमिलीअरसाठी ग्राह्य धरण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दौंड-मनमाड दुहेरी करणाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू

0
पुणतांबा (वार्ताहर) – परिसरात रविवारी सकाळी 10 वाजेपासून दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्प मांडताना दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणास मंजुरी दिली होती.
तसेच 2021 पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार या दुहेरीकरणाच्या मार्गाचे सर्वेक्षण सुुरु झाले असून रविवारी सकाळी आठरावाडीजवळ असलेल्या रेल्वे मार्गाजवळ तसेच चितळीच्या पुढे दोन टीम मार्फत अत्याधुनिक साधनांचा वापर करून मोजमाप घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी मात्र माहिती देण्यास नकार दिला.
तसेच याबाबत पुणतांबा रेल्वे स्थानकाचेे स्टेशन व्यवस्थापकांना विचारणा केली असता त्यांनाही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्राथमिक माहितीनुसार आहे त्या रेल्वे मार्गापासून दोन्ही बाजूने किमान चाळीस फूट अंतर गृहीत धरून मोजमाप केले जात असल्याची चर्चा आहे. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे रेल्वे मार्गाजवळच असलेली अनेक बांधकामे दुकाने भविष्यात हटविली जाण्याची शक्यता वर्तविली जात असून अनेकांचे आतापासूनच धाबे दणाणले आहेत.

सोमवार, दि. १८ डिसेंबर २०१७

0
सोमवार, दि. १८ डिसेंबर २०१७

18 December 2017

0

सेंट फ्रान्सिसचा क्रीडा महोत्सव उत्साहात

0
नाशिक । सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणेनगर क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात पत्रित ग्रंथ बायबल मधील प्रार्थना गितांनी करण्यात आली.

या महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात धावण्याची स्पर्धा, चॉकलेट खाणे, बटाटा, रिंग रेस,चमचा लिंबू आदी स्पर्धांत विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला होता.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संजय राकेचा, अस्मिता दुधारे, शंतनू पाटील, योगिता सोनवणे उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना सुवर्ण, रजत, कांस्य पदव व प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक संजय पाटील, पर्यवेक्षिका पौर्णिमा सोमवंशी, मंजू पाटील ,लता खैरनार यांनी अभिनंदन केले.

#INDvsSL : भारतासमोर 216 धावांचे आव्हान

0

तिसऱ्या वनडे सामन्यात भारताविरुद्ध फलंदाजीवर उतरलेला श्रीलंकेचा संघ 44.5 ओव्हरमध्ये ऑल आऊट झाला.

श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी 216 धावांचे आव्हान ठेवले आहे.

यात सर्वाधिक धावा उपुल थरंगा (95) आणि सदीरा समरविक्रमाने 42 धावा काढल्या आहेत.

तत्पूर्वी भारताने टॉस जिंकून प्रथम फील्डिंग करण्याचा निर्णय घेतला.

तीन सामन्यांच्या सिरीजमध्ये भारत आणि श्रीलंका दोन्ही संघांकडे 1-1 असे गुण आहेत.

Social Media

22,015FansLike
4,608FollowersFollow
286SubscribersSubscribe
error: Content is protected !!