…तर 2002 मध्येच एकत्र आले असते अमीर,शाहरुख आणि सलमान, जाणून घ्या नेमकी काय झाले?

Email This Post
2002 मध्ये अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांचे दिग्दर्शकीय पदार्पण असलेला ‘ओम जय जगदिश’ हा चित्रपट आमीर, शाहरुख आणि सलमानला ऑफर केला होता. यासंदर्भातील रिपोर्ट बॉलिवूड लाईफ या वेबसाईटने दिला आहे.

तिघांनी ऑफर स्वीकारली असती, तर अनिल कपूरने साकारलेल्या मोठ्या भावाच्या म्हणजे ओमच्या भूमिकेत आमीर, फरदीन खानची भूमिका असलेल्या मधल्या भावाच्या भूमिकेत शाहरुख तर अभिषेक बच्चनने साकारलेल्या जगदीश या धाकट्या भावाच्या भूमिकेत सलमान दिसला असता.

आमीरसोबत काजोल (आयेशा), शाहरुखसोबत राणी मुखर्जी (नीतू), तर सलमानसोबत प्रिती झिंटा (पूजा) झळकल्या असत्या. दुर्दैवाने या सहाही कलाकारांनी तारखा उपलब्ध नसल्याने ही भूमिका नाकारली. त्यामुळे महिमा चौधरी, उर्मिला मातोंडकर, तारा शर्मा यांच्या पारड्यात अनुक्रमे या भूमिका पडल्या.

यशराज फिल्म्सनी हे कलाकार काम करणार असतील, तरच पैसे गुंतवण्याची अट घातली होती. त्यामुळे अखेर वाशू भगनानींनी हा सिनेमा प्रोड्युस केला.

LEAVE A REPLY

*