सांगलीत भीषण अपघात ; 6 जणांचा जागीच मृत्यू ; १० जखमी

Email This Post
सांगली : पंढरपूरहून दर्शन घेऊन परतणाऱ्या भविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात सहा भाविक जागीच ठार झाले तर इतर दहा जन गंभीर जखमी झाले आहेत.

सांगलीतील कवठेमहाकाळ तालुक्यातील आगळगाव फाट्याजवळ पहाटे चार वाजेच्या सुमारास अपघात घडला. अपघातात ठार झालेल्या भाविकांमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये दोन लहान मुले, 1 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. सर्वजण कोल्हापुरातील जिल्ह्यातील माले गावातील रहिवाशी असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*