दोन मुलांसह आईची आत्महत्या

Email This Post

कोपरगाव तालुक्यातील घटना

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)-  तालुक्यातील कान्हेगाव-वारी शिवारात एका महिलेने दोन मुलांसह रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झालेले नाही.
माधुरी रमेश चौधरी (वय 28 रा.शिंगवे ता.राहाता) या महिलेने मुलगा आदित्य रमेश चौधरी वय 4 वर्ष मुलगी वैष्णवी रमेश चौधरी वय 2 वर्ष या दोन मुलांसह कान्हेगाव ते पुणतांबा दरम्यान कान्हेगाव शिवारात दुपारी 12.30  वाजण्याच्या पूर्वी एका मालगाडीच्या खाली जावून तिघांनी आत्महत्या केल्याच्या घटनेची माहिती कान्हेगाव रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर यांनी कोपरगाव ग्रामिण पोलीस स्टेशनला कळविली. त्यावरुन कोपरगाव ग्रामिण पोलीस स्टेशनमध्ये  आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक शहाजी नरसुडे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि संजय पवार करीत आहेत.
मयत महिला व मुलांचे मृतदेह कोपरगाव ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहेत. मयत माधुरी चौधरी यांचे आत्महत्येचे कारण अस्पष्ट असले तरी कौटूंबिक वादातून आत्महत्या केल्याचा पोलीसांना संशय आहे.

LEAVE A REPLY

*