FB: सुनीलबरोबर झालेल्या वादावर कपिलचे फेसबुकद्वारे स्पष्टीकरण

Email This Post

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात झालेल्या वादामुळे सध्या कलाविश्वात विविध चर्चांना उधाण आले आहे.

सदर घटनेनंतर कपिलने केलेल्या फेसबुक पोस्टने अनेकांचेच लक्ष वेधले.

पाच वर्षांत आपण पहिल्यांदाच सुनीलवर इतक्या मोठ्याने ओरडलो असल्याचे म्हणत कपिलने झाल्या घटनेबद्दल त्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

‘मी सुनीलचा आदर करतो. हो, आमच्यात काही कारणास्वत खटके उडाले… पण, आम्ही सर्वसामान्य व्यक्ती नाही का? गेल्या पाच वर्षांत मी पहिल्यांदाच त्याच्यावर इतक्या मोठ्याने ओरडलो. एवढं तर चालतं… आमच्यात जे काही मतभेद आहेत त्यावर आम्ही बसून तोडगा काढू. एक व्यक्ती म्हणून आणि एक कलाकार म्हणून मी त्याचा (सुनीलचा) नेहमीच आदर करतो’, असे कपिलने त्याच्या एफबी पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यासोबतच हे आमचे कौटुंबिक प्रकरण असून, सर्वकाही लवकरच पूर्वपदावर येईल, असेही त्याने स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*