‘झी चित्रगौरव पुरस्कार २०१७’ चे विजेते

Email This Post

नुकताच झी गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात दिमाखदार पद्धतीने पार पडला.

सैराट’ चित्रपटाची जादू याही पुरस्कार सोहळ्यावर बघायला मिळाली. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक यासहित आठ पुरस्कारांवर ‘सैराट’ने आपलं नाव कोरलं.

डोळे दीपवून टाकणारा रंगमंच, त्यावर सादर होणारे रंगतदार नृत्याविष्कार आणि प्रेक्षकांमधून वाहणारा सळसळता उत्साह अशा वातावरणात उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या सोहळ्याचं आकर्षण ठरला तो जीवनगौरव पुरस्कार.

सालस अभिनयाने मराठीच नव्हे तर हिंदी रसिकांचीही मने जिंकणा-या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना सीमाताईंसह उपस्थित प्रेक्षकही भारावून गेले होते.

झी चित्रगौरव पुरस्कार २०१७ विजेते
सर्वोत्कृष्ट वेशभूषा- सचिन लोवळेकर (हाफ तिकीट)
सर्वोत्कृष्ट रंगभूषा- विद्याधर भट्टे (एक अलबेला)
सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन- वासू पाटील (हाफ तिकीट)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन- राहूल – संजीव (‘ओ काका’ – वाय झेड)
उत्कृष्ट संकलन- मोहित टाकळकर  (कासव)
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – संजय मेमाणे (हाफ तिकीट), धनंजय कुलकर्णी (कासव)
सर्वोत्कृष्ट ध्वनिरेखाटन- अनमोल भावे (उबुंटू)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- अजय-अतुल (सैराट)
सर्वोत्कृष्ट गीतकार- समीर सामंत (‘माणसाने माणसाशी’ – उबुंटू)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- श्रेया घोषाल (आताच बया का बावरलं- सैराट)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अजय गोगावले  (याड लागलं – सैराट)
सर्वोत्कृष्ट संगीत- अजय-अतुल (सैराट)
सर्वोत्कृष्ट कथा- राजन खान (हलाल)
सर्वोत्कृष्ट पटकथा- गिरीश जोशी (टेक केअर गुडनाइट)\
सर्वोत्कृष्ट संवाद- सुमित्रा भावे (कासव)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- प्रियांका बोस कामत (हाफ तिकीट)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- प्रियदर्शन जाधव (हलाल)
गार्नियर नॅचरल प्रस्तुत मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर – रिंकू राजगुरु (सैराट)
इम्पेरिअल ब्लु पिपल्स चॉईस सर्वोत्कृष्ट पदार्पण- आकाश ठोसर (सैराट)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार- शुभम मोरे, विनायक पोतदार (हाफ तिकीट)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- इरावती हर्षे (कासव)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- गिरीश कुलकर्णी (जाऊंद्याना बाळासाहेब)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- नागराज मंजुळे (सैराट)
सर्वोत्कृष्ट चित्रपट- (सैराट)

LEAVE A REPLY

*