कोल्हापूर : विश्वास नांगरे पाटलांचे भन्साळींनी मानले आभार!

Email This Post

पोलिसांनी ‘पद्मावती’ चित्रपटाच्या मसाई पठारावरील सेटवर झालेल्या हल्ल्यानंतर केलेल्या सहकार्याबद्दल या चित्रपटाचे निर्माते संजय लीला भन्साळी यांनी महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानले आहेत.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाला भेट देणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांचा त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये विशेष उल्लेख करून धन्यवाद दिले आहेत. या घटनेनंतर ट्विटर वर दिलेली ही त्यांची पहिली प्रतिक्रिया आहे.

मंगळवारी मध्यरात्री प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटाचा सेट जाळण्याचा प्रकार घडला. ही घटना पन्हाळजवळच्या मसाई पठारावर घडली. अज्ञात लोकांनी चित्रीकरण बंद पाडण्याच्या हेतूने तंबूमध्ये बांबू व बीअरच्या बाटलीत पेट्रोल भरून सेट पेटवून दिला.

बुधवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली.

त्यांच्यासोबत पन्हाळ्याचे पोलीस निरीक्षक, तहसीलदार राम चौबे पहाटे घटनास्थळी दाखल झाले. सकाळी कोल्हापूर पोलिस अधीक्षक महादेव तांबडे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे अधिकारी, श्‍वानपथक आदी घटनास्थळी दाखल झाले.

LEAVE A REPLY

*