‘विटी दांडू’ नंतर अजय देवगण पुन्हा मराठी चित्रपटाची निर्मिती करणार ; नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसणार

Email This Post

‘विटी दांडू’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर, अजय देवगण आता पुन्हा एकदा मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहे.
नाना पाटेकर हे मुख्य भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट एक थ्रिलर चित्रपट असणार आहे.

यात नाना पाटेकर एका आगळ्या-वेगळ्या अंदाजात तुम्हा-आम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्याभोवती या चित्रपटाची कथा फिरणार असल्याची माहिती आहे.

अजय देवगणसोबतच खुद्द नाना आणि अभिनव शुक्ला हेही या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

तर मराठीतील प्रतिभावंत दिग्दर्शक सतीश राजवाडे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा जिम्मा सांभाळणार आहेत.

LEAVE A REPLY

*