‘हम्टी’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ नंतर तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

Email This Post

आलिया भट्ट आणि वरूण धवन यांचा ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ चांगलाच गाजत आहे.

बद्री आणि त्याची दुल्हनिया पुन्हा एकदा आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तेही ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’च्या पुढच्या भागात. होय, चित्रपटाचे दिग्दर्शक शशांक खेतान यांनी स्वत: याचे संकेत दिले आहेत.

‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ नंतर आम्ही या चित्रपटाच्या फ्रेंचाइजीला पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.

‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. बॉक्सआॅफिसवर ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ला चांगली ओपनिंग मिळाली.

या यशानंतर आम्ही तिसऱ्या पार्टचे प्लानिंग करणार आहोत. तूर्तास स्क्रिप्ट तयार नाहीये पण ती लवकरच तयार होईल, इतके नक्की, असे खेतान म्हणाले.

या फ्रेंचाइजीमध्येही वरूण धवन व आलिसा भट्ट हे दोघेच असतील असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*